Published On : Wed, Jul 31st, 2019

कामठितील बनावट विदेशी दारू अड्यावर धाड,

एक आरोपी अटक, 47 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त

कामठी:- कामठी पोलीस स्टेशन हद्दीत विविध ठिकाणी बनावट विदेशी दारू अड्डे अवैधरीत्या सुरू असून परराज्यातील विदेशी दारू महाराष्ट्र राज्यातील विदेशी दारूच्या बॉटल मध्ये घालून अवैधरित्या विक्री होत असल्याची गुप्त माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळताच उत्पादन शुल्क विभागाच्या विभागोय भरारी पथकाने वारीसपुरा येथील वैष्णवी किराणा दुकानात धाड घालून रॉयल स्टेग, मॅक्डोल नं 1, व्हिस्की च्या खाली बॉटल मध्ये मध्यप्रदेश राज्य निर्मिती बॉम्बे स्पेशल व्हिस्की व त्यावर हरियाणा राज्यातील बुचे लावलेल्या सीलबंद असलेल्या 750 मी ली च्या अवैध विदेशी दारू च्या बॉटल तसेच रॉयल स्टेग व मॅक्डोल नं 1 च्या खाली बॉटल व परनोड रेकॉर्ड इंडिया प्रा बडोली हरियाणाचे बुचे असा एकूण 47 हजार 600 रुपये किमतीचा मुद्देमालासह आरोपी महाराष्ट्र दारूबंदी कायदा चे कलम 65(ए), (ई), 81, 83 व 108 अनव्ये गुन्हा नोंदवीत अटक करण्यात आले.अटक आरोपीचे नाव कमल हिरालाल हसोरिया रा वारीसपुरा कामठी असे आहे.

ही यशस्वी कारवाही राज्य उत्पादन शुल्क विभाग नागपूर चे विभागोय उपायुक्त उषा वर्मा यांच्या मार्गदर्शनार्थ निरीक्षक सुभाष खरे , दुययम निरीक्षक विशाल कोल्हे, धनराज राऊत, प्रकाश मानकर, प्रशांत घावळे, अंकुश भोकरे, विनोद दुबे आदींनी केले असून पुढील तपास दुययम निरीक्षक डी वाय राऊत करीत आहेत.

संदीप कांबळे कामठी