Published On : Tue, Sep 22nd, 2026
By Nagpur Today Nagpur News

केंद्राची वाट न पाहता शेतकऱ्यांना मदत, दुष्काळासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती

Advertisement

Nagpur: Fadnavis Defends UPI Charges, Takes Dig at Rahul Gandhi

मुंबई : राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. केंद्र सरकारकडून मदत मिळण्याची प्रतीक्षा न करता राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मदत देण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिली.

दुष्काळ जाहीर करण्यासाठी केंद्राच्या निकषांनुसार आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी लागते. ५ ऑक्टोबरनंतरचे पंचनामे ग्राह्य धरून त्याआधारे केंद्र सरकारकडे मदतीचा प्रस्ताव पाठवता येतो, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. ही तांत्रिक प्रक्रिया सुरूच राहणार असून, त्यासाठी राज्य सरकार केंद्राच्या मदतीची वाट पाहत बसणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

Gold Rate
Sept 17,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,500 /-
Gold 22 KT ₹ 1,40,500 /-
Silver/Kg ₹ 2,29,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाने शेतकऱ्यांना कोणत्या स्वरूपात मदत देता येईल, यासाठी कार्यवाही सुरू केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करू नये, सरकार त्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीवरून विरोधकांनी संवेदनशीलता दाखवावी, दुष्काळाच्या प्रश्नाला ‘इव्हेंट’चे स्वरूप देऊ नये, असे आवाहनही फडणवीस यांनी केले. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसमोरील दुष्काळाचे संकट दूर व्हावे आणि त्यांना दिलासा देता यावा, अशी प्रार्थना गणरायाकडे केल्याचेही त्यांनी सांगितले.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.