Published On : Thu, Jun 30th, 2022
By Nagpur Today Nagpur News

प्रारूप मतदार यादीवरील हरकती व सूचनांसाठी ३ जुलैपर्यंत मुदतवाढ

Advertisement

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांवर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी असलेली १ जुलै २०२२ पर्यंतची मुदत आता ३ जुलै २०२२ पर्यंत वाढविण्यात आली आहे. मनपा आयुक्त आणि प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांनी नागरिकांना या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. यासाठी शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवशी देखील झोन स्तरावर हरकती व सूचना घेण्याबाबत आवश्यक व्यवस्था करण्यात येणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे नागपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी नागपूर महानगरपालिकेच्या www.nmcnagpur.gov.in या संकेतस्थळावर आणि ट्रू- व्होटर मोबाईल ॲपवरही उपलब्ध आहेत. त्यावर १ जुलै २०२२ पर्यंत हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत होती. परंतू ही मुदत आता ३ जुलै २०२२ पर्यंत वाढविण्यात आली आहे.

ट्रू- व्होटर मोबाईल ॲप ‘प्ले स्टोअर’ वरून डाऊनलोड करता येईल. त्याआधारे प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीत आपले नाव शोधून त्याबाबत हरकत असल्यास ती सुद्धा दाखल करता येईल. ‘व्होटर लीस्ट’ सर्च या मेनूवर क्लिक केल्यानंतर आपले नाव टाकून पुढे जाता येईल. नाव शोधल्यावर आपला संपूर्ण तपशील दिसू शकेल.

विधानसभा मतदारसंघाची यादी प्रभागनिहाय विभाजित करताना त्यात नवीन नावांचा समावेश करणे किंवा नावे वगळण्याचा राज्य निवडणूक आयोगाला अधिकार नाही. दि.31/05/2022 रोजी अस्तीत्वात असलेल्या विधान सभेच्या मतदार यादीनुसार एखाद्या मतदारास चुकीचा प्रभाग वाटप झाल्यास किंवा विधानसभेच्या मतदार यादीत नाव असूनही महानगरपालिकेच्या मतदार यादीत नाव नसल्यास, हरकत दाखल करता येते. हरकती व सूचना दाखल करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असली तरी प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या ९ जुलै २०२२ रोजीच प्रसिद्ध करण्यात येतील.

Advertisement

सर्व संबंधित मतदारांनी आपले नांव मतदारयादीत समाविष्ट असल्याची तसेच योग्य प्रभागात समाविष्ट असल्याची खात्री करुन घेणे आवश्यक असुन यासाठी मनपा संकेतस्थळाचा, ट्रू वोटर ॲपचा वापर करु शकतात तसेच प्रत्यक्ष संबंधित झोन कार्यालयात प्रत्यक्ष मतदार याद्या पाहु शकतात. सर्व राजकीय पक्ष, पदाधिकारी, मतदार यांनी याची नोंद घेण्याचे आवाहन मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी यांनी केले आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.