Published On : Tue, Aug 8th, 2023
By Nagpur Today Nagpur News

नागपूरजवळील बोरीत नकली देशी दारू बनविणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश !

Advertisement

नागपूर : शहरातील बोरी पोलीस स्टेशन हद्दीत फॉर्मवर नकली देशी दारू बनविणाऱ्या कारखानाऱ्याचा छडा लावत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापेमारी केली.आज स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ब्राह्मणी शेत शिवारातील पोल्ट्री फॉर्मवर धाड टाकली. अर्जुन शंकसिंग राजपूत रा. उज्जैन म. प्र याच्यासह 10 आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

पोलिसांन प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार, आरोपींकडून नकली देशी दारू बनविण्यासाठी वापरण्यात येणारे रसायन, पॅकेजिंग करणारी मशीन, बनावत लेबल, फ्लेवर् बॉटल, देशी दारू वाहने व इतर साहित्य असा एकूण 54,48592 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नागपूर(ग्रामीण) विशाल आनंद (भा.पो.से.) तसेच अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांच्या मार्गदर्शनात मस्के सा. प्रो.ips. राहुल झालंटे प्रो. उप-अधीक्षक. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, पो उपनी आशीष मोरखडे , HC मिलिंद नांदूरकर, अरविंद भगत, मयूर ढेकले, संजय बांते NPC रोहन डाखोरे, अमृत किंगे PC राकेश तालेवार,निलेश हिंगुलकर, राहुल साबळे, पो, शी सुमित बांगडे यांनी पार पाडली.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.