Published On : Wed, Jun 28th, 2023
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात मावशीनेच लोटले मुलीला देहव्यापाराच्या दलदलीत !

Advertisement

नागपूर : पैसे कमविण्याच्या लालसेपोटी मावशीनेच बारावीत शिक्षण घेणाऱ्या मुलीला देहव्यापाराच्या दलदलीत लोटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रियकर व दलालाच्या माध्यमातून तिला हॉटेलमध्ये थांबलेल्या न ग्राहकाकडे सोपविण्यात आले. मात्र, गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून तिच्या मावशी आणि प्रियकराचा हा कट उधळून काढला.

या प्रकरणाचा पर्दाफाश हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडधामन्यातील हॉटेलमध्ये करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित १८ वर्षीय मुलगी प्रिया (बदललेले नाव) ही मूळची चंद्रपूर जिल्ह्यातील असून ती मावशी महिमा हिच्याकडे राहून शिक्षण घेते. शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी मावशीने तिला काही दिवस देहव्यापार करण्याचा सल्ला दिला. मात्र, प्रियाने देहविक्री करण्यास नकार दिला. त्यामुळे शिक्षण बंद करून परत गावी पाठविण्याची धमकी दिली. भीतीमुळे प्रिया देहव्यापार करण्यास तिला भाग पाडले.

Gold Rate
06Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,20,300 /-
Gold 22 KT ₹ 1,11,900 /-
Silver/Kg ₹ 1,48,700/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

शिक्षणाचा खर्च निघावा म्हणून मुलीने देहव्यापार करण्यास होकार दिला. मुलीची मावशी महिमा हिचे सेक्स रॅकेटमधील दलाल शिवा लोधिया (रा. कळमना) याच्याशी प्रेमसंबंध होते. महिमा आणि शिवा यांनी स्मिताला देहव्यापारात ओढले. वडधामन्यातील हॉटेल मॉं. अन्नपूर्णा येथे रुम बुक केली. प्रियालाला ग्राहकांकडे पाठवून मोठी रक्कम कमवायला सुरुवात केली.

हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट चालत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त मुमक्का सुदर्शन यांना मिळाली. त्यांनी एसएसबी पथकाला छापा घालण्याचे आदेश दिले. मंगळवारी पोलिसांनी हॉटेलमध्ये बनावट ग्राहक पाठवला. तेथे उपस्थित आरोपी दलाल अमोल ढेरे याला तरुणीची मागणी केली.

त्याने लगेच शिवाला फोन करून प्रियाला ग्राहक आल्याचे सांगून हॉटेलमध्ये आणण्यास सांगितले. बाहेर सापळा रचून बसलेल्या पोलिसांना इशारा देताच हॉटेलमध्ये छापा घालण्यात आला. प्रियाची सुटका करण्याता आली तर शिवा आणि अमोल या दोघांना अटक करण्यात आली. या प्रकरणी हिंंगणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार झालेली मावशी महिमाला शोधण्यास सुरुवात केली आहे.

Advertisement
Advertisement