Published On : Sat, Jun 29th, 2019

कार्यकारी अभियंता कुकरेजा, चौगंजकर यांच्यासह ६८ अधिकारी-कर्मचारी सेवानिवृत्त

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या सेवेतून शनिवारी (ता. २९) कार्यकारी अभियंता मोती कुकरेजा आणि अनिरुद्ध चौगंजकर यांच्यासह ६८ अधिकारी-कर्मचारी सेवानिवृत्त झाले. त्यांचा नागपूर महानगरपालिकेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्थायी समिती सभागृहात आयोजित कार्यक्रमात सर्व सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना निरोप देण्यात आला. यावेळी निगम अधीक्षक मदन सुभेदार, सहायक अधीक्षक मदन कर्णिक, सहायक अधीक्षक श्री. डहाके, डोमाजी भडंग उपस्थित होते.

सर्वांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, तुळशीचे रोप आणि धनादेश देऊन सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्तींमध्ये कार्यकारी अभियंता एम.जी. कुकरेजा, वैद्य डी.डी. दांडेकर, एस.डी. घुरडे, कनिष्ठ अभियंता एन. बी. सालोडकर, सहायक ग्रंथपाल व्ही. एस. भुते, इलेक्ट्रिक ऑपरेटर आर. एम. झोडापे, टर्नर एम.बी. वाघमारे, कनिष्ठ लिपिक सी.पी. कुहीकर, कर संग्राहक एस. आर.शिवणकर, के. एन. बनकर, मधुकर ठाकरे, हवालदार बी.बी. लांजेवार, मलवाहक जमादार एल. आर. तिरपुडे, मुख्याध्यापक आबेदा खातून मो. मुशताक शेख, श्रीमती रजिया सुलताना गौस महंमद, सहायक शिक्षक मंगला साधनकर, शिला पाचपोहर, शोभा गणोरकर, प्रतिभा राऊत, इंदू कडबे, अशोक देशमुख, अब्दुल हन्नान अ. लतीफ यांच्यासह विविध विभागातील सुरेखा अरमरकर, रमेश भलावी, कांता बावरे, साजेदा बेगम, नारायण काळे, रामदास पोटभरे, गिरीधर बिपटे, सुनंदा बांते, पंजाबराव काळबांडे, सुरेश बोरकर, भास्कर पांडे, प्रमिला चामट, मारोती भोले, देशपाल गवारे, केशव आंबुलकर, मो. जमील मो. शरीफ, शोभा वाघमारे, नंदा काळे, रामदास उके, गंगाधर चौधरी, डी. पी. मालवी, सय्यद नजर अब्बास आबदी, शंकर हटवार, सुरेश हेडाऊ, यमुना अंबादे, चंद्रकांत आळे, श्रीमती सगीराबी जलील खाँन, मधुकर रामटेके, धनवात हाटे, रामदास घरडे, त्रिवेणी अरखेल, सिद्धार्थ पाटील, रूपचंद रंगारी, राजाराम नारनवरे, वानम पिल्लेवार, अनिल पेसारे, रामदास गडेकर, पंढरी राऊत, अशोक गोंडाणे, वंदना श्रीराम, माणिक मेश्राम यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन आनंद आंबेकर यांनी केले.