Published On : Tue, Apr 7th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात खळबळ! गणेश पेठेत जिलेटिन व ५८ डेटोनेटर सापडले; CP रविंद्र सिंगल घटनास्थळी

बॉम्ब शोधक पथक सक्रिय, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
Advertisement

नागपूर : गणेश पेठ परिसरात डोसर भवनजवळ संशयास्पद बॅगमध्ये जिलेटिनच्या काड्या आणि ५८ डेटोनेटर आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. घटनेची गंभीरता लक्षात घेता शहराचे पोलीस आयुक्त (CP) रविंद्र सिंगल स्वतः घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थितीचा आढावा घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ही बॅग उज्ज्वल लांजेवार यांच्या अंगणात सापडली. लांजेवार हे जी.एस. कॉलेजचे माजी संचालक असल्याची माहिती समोर आली आहे. स्फोटक साहित्य सापडल्यानंतर तात्काळ गणेश पेठ पोलिसांनी परिसर सील केला.

बॉम्ब शोधक व नाशक पथक (BDDS) घटनास्थळी पोहोचून स्फोटकांची तपासणी करत आहे. पोलिसांनी परिसरात तगडा बंदोबस्त तैनात केला असून नागरिकांना सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्राथमिक तपासात हे साहित्य बांधकाम किंवा इतर तांत्रिक कारणांसाठी वापरले जाते का, की यामागे कोणता घातपाताचा कट आहे, याचा तपास सुरू आहे. CP सिंगल यांच्या उपस्थितीत तपास अधिक वेगाने सुरू असून, लवकरच अधिकृत माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Advertisement

दरम्यान, या घटनेमुळे गणेश पेठ परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी नागरिकांना अफवांपासून दूर राहण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.