Published On : Wed, Jun 11th, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपुरातील मायो रुग्णालयाजवळच्या टॉयलेटमध्ये अज्ञात इसमाचा गळफास घेतलेला मृतदेह आढळल्याने खळबळ!

Advertisement

नागपूर : मायो रुग्णालयाच्या ओपीडी परिसराजवळील शौचालयात मंगळवारी (10 जून) सायंकाळी साडेआठच्या सुमारास एका मध्यमवयीन अज्ञात पुरुषाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. ही घटना तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

संबंधित व्यक्तीस तत्काळ डॉक्टरांकडे नेण्यात आले, मात्र तपासणीनंतर त्याला मृत घोषित करण्यात आले. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत इसमाचे वय अंदाजे ४५ वर्षे असून त्याचा रंग काळसर, चेहरा गोलसर, बांधा मध्यम, उंची सुमारे ५ फूट, डोळे काळे व केस लहान काळे होते. त्याला काळसर-पांढऱ्या रंगाची पातळ दाढी व मिशा होत्या. त्याने काळ्या रंगाचा फुल स्लीव्ह शर्ट (पांढऱ्या फुलांचे डिझाईन असलेला), काळी फुल पँट व आतील कपडे परिधान केले होते. त्याच्या पोटाच्या उजव्या बाजूस जुने व्रण आणि उजव्या हातास फ्रॅक्चरचा खुणा होता.

ही घटना रुग्णालयातील सुरक्षा रक्षक ऋषभ सुरेश पोहकार (२९, रा. लकडगंज) याच्या निदर्शनास आली. त्याने दिलेल्या माहितीनुसार, तहसील पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक भगत यांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरु आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.