Published On : Mon, Jul 22nd, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात रेल्वे रुळावर अज्ञात व्यक्तीचा छिन्नविछिन्न अवस्थेत मुतदेह आढळल्याने खळबळ; हत्येचा संशय

Advertisement

नागपूर : शहरातील यशोधरा नगर पोलीस ठाण्यांतर्गत मांडवा वस्तीजवळील रेल्वे रुळाजवळ अज्ञात व्यक्तीचा छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला असून पुढील तपास सुरू केला.

खून करून या व्यक्तीचा मृतदेह येथे आणून फेकण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. यशोधरानगर पोलीस ठाण्यांतर्गत मांडवा वस्तीजवळील रेल्वे लाईनजवळ अज्ञात व्यक्तीचा मृतदेह पडल्याची माहिती सोमवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली. ही माहिती मिळताच यशोधरा नगर पोलीस पथक आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीचा छिन्नविछिन्न अवस्थेत असेलला मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवून पुढील तपास सुरू केला.

या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. या व्यक्तीच्या गळ्याभोवती दोरीचा तुकडा गुंडाळलेला आढळून आला असून त्याच्या शरीरावर जखमेच्या खुणाही आढळून आल्या आहेत.त्यामुळे 30 ते 35 वयोगटातील या व्यक्तीची हत्या करून हा मृतदेह तेथे आणून टाकला असावा, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

हा मृतदेह सुमारे तीन ते चार दिवसांपूर्वीचा असल्याचे सांगण्यात येत आहे. या मृतदेहाचे गूढ उकलण्यासाठी यशोधरा नगर पोलीस शहर व परिसरातून गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता झालेल्या लोकांची माहिती गोळा करत आहेत.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.