नागपूर :गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. सेमिनरी हिल्स परिसरात असलेल्या केंद्र सरकारच्या क्वॉर्टर्समध्ये दांपत्याचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली.दीपक गजभिये (५६) व विद्या गजभिये (५३) अशी मृतक पती-पत्नीची नावे आहेत.
माहितीनुसार,दीपक एअरफोर्समध्ये ड प्रवर्गातील कर्मचारी म्हणून कार्यरत होते. तर विद्या या गृहिणी होती. दोघेही कामठीतील बुद्धनगर, जयभीम चौक येथे राहात होते. १६ वर्षांपासून ते कामानिमित्त नागपुरात राहत होते. त्यांना एक मुलगी व मुलगा आहे. या घटनेच्या वेळी त्यांचे मुलगा व मुलगी कामठीला कामानिमित्त गेले होते. दुपारी ते परतल्यावर दरवाजा उघडला असता दीपक गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले. तर विद्या खाली बेशुद्ध अवस्थेत पडल्या होत्या. त्यांना रुग्णालयात नेते असता डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. दरम्यान दोघांनी आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. घटनास्थळावरून पोलिसांना कुठलीही सुसाईड नोट आढळली नाही. गिट्टीखदान पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे.