Published On : Thu, Mar 6th, 2025
By Nagpur Today Nagpur News

महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने…; जोशींच्या वादग्रस्त विधानानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया

Advertisement

मुंबई :राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैय्याजी जोशी यांच्या मुंबईतील मराठी भाषेबाबतच्या वक्तव्यामुळे विरोधकांसह सर्व स्तवरावरून संताप व्यक्त करण्यात येत आहे. विरोधकांनीही या वक्तवावरून सरकारला घेरले. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले मत मांडले. फडणवीस म्हणाले की, भय्याजी जोशी यांचे वक्तव्य मी ऐकलेले नाही. ते पूर्णपणे ऐकून, माहिती घेऊन मी बोलेन.पण सरकारची भूमिका पक्की आहे.

मुंबईची, महाराष्ट्राची , महाराष्ट्र शासनाची भाषा मराठीच आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकले पाहिजे, प्रत्येकाला मराठी बोलता आलं पाहिजे. माझ्या वक्तव्यात, त्या संदर्भात भय्याजी जोशी यांचे दुमत असेल असे मला वाटत नाही. तथापि पुन्हा एकदा शासनाच्या वतीने सांगतो, मुंबईची भाषा मराठी आहे, महाराष्ट्राची भाषाही मराठी आहे. इतर भाषांचा इथे सन्मान आहे.

कोणत्याही भाषेचा आम्ही अपमान करणार नाही. कारण जो स्वत:च्या भाषेवर प्रेम करतो, तोच दुसऱ्याच्या भाषेवरही प्रेम करू शकतो, त्यामुळे तो सन्मान आहेच. यावर शासनाची भूमिका पक्की आहे, शासनाची भूमिका मराठी आहे, असा पुनरुच्चार मुख्यमंत्री फडणवीसांनी केला.

दरम्यान मुंबईत एका कार्यक्रमादरम्यान राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे माजी सहकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी मराठी भाषेविषयी वादग्रस्त विधान केले. मुंबईची कुठलीही एक भाषा नाही. मुंबईच्या अनेक भाषा आहेत. वेगवेगळ्या परिसरात विविध भाषा बोलल्या जातात. घाटकोपर परिसराची भाषा गुजराती आहे. तर गिरगावात हिंदी बोलणारे कमी आहेत. तिथे तुम्हाला मराठी भाषा बोलणारे लोक आढळतील. मुंबईत येणार्‍या व्यक्तीने मराठी शिकलं पाहिजे असं काही नाही, असे वक्तव्य जोशी यांनी केले.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.