Published On : Sat, Sep 21st, 2019

आठवडा लोटूनही आजनीतील राकेश उंबरकर मृत्यू प्रकरणाचे रहस्य उलगडेना

Advertisement

हत्या की आत्महत्या रहस्य अजूनही कायमच

कामठी :-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या (रडके)आजनी गावातील 24 वर्षोय राकेश शंकर उंबरकर नामक तरुणाचा धारदार शस्त्राने गळा चिरून असलेल्या स्थितीत मृतदेह आढळल्याची घटना 13 सप्टेंबर ला सकाळी 6 वाजता निदर्शनास आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करीत चर्चेचा विषय ठरला होता . आज या घटनेला एक आठवडा लोटला मात्र या प्रकरणातील हत्या की आत्महत्या चे रहस्य अजूनही कायम आहे.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

प्राप्त माहितीनुसार संशसायस्पद मृतक हा मूळचा भिवापूर तालुक्यातील नक्षी गावाचा राहिवासी असून वयाच्या 5 व्या वर्षापासूनच कामठी तालुक्यातील आजनी गावातील रहिवासी मोठी आई राधाबाई रामभाऊ काकडे कडे वास्तव्यास होता . तसेच वयाधीन अवस्थेत जुनी ओली कामठी येथील ओम किराणा स्टोर्स येथे नौकर म्हणून कार्यरत होता.12सप्टेंबर गणेशोत्सव विसर्जन चा दिवस असल्याने कामावर गेला नव्हता तर दुसऱ्या दिवशी सकाळी घरमंडळी सकाळी उठल्यावर मृतक राकेश घरात दिसून न आल्याने मृतकाची मोठी आई

त्याला बघण्यासाठी घराच्या छतावर गेली असता मृतक हा छताच्या लोखंडि साखळीला एका लहानश्या पांढऱ्या रंगाच्या हातरुमालीने गळा बांधून असून गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याने मृतावस्थेत दिसून आला.हे दृश्य बघून एकच धक्का बसला दरम्यान या घटनेसंदर्भात ही हत्या की आत्महत्या या चर्चेला अधिकच उधाण आले.

Advertisement

घटनेची माहिती मिळताच नवीन कामठी पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनार्थ नजीकच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हलवित मृतकाच्या पार्थिवावर रीतसर पद्धतिने शवविच्छेदन करीत तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली मात्र या घटनेणदर्भात हत्या की आत्महत्या, मृत्यूचे नेमके कारण काय?याबाबत पोलिस त्या दिशेने तपास करीत आहे मात्र आठवडा लोटूनही या प्रकरणाचा उलगडा होत नसल्याने हे प्रकरण पोलिसांना आव्हानात्मक ठरत आहे.

संदीप कांबळे कामठी

Advertisement
FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है वसूली?

FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है...

नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews

नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews

मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews #KisanAndolan

मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews...

12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews

12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews

अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews

अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges