Published On : Tue, May 19th, 2020

कोरोनाच्या संकटातही राज्यातील महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी – नामदार सुनीलबाबू केदार

शेतकऱ्यांना बी बियाणे व खताची अडचण भासनार नाही याची प्रशासनाने दक्षता घ्यावी-ना सुनीलबाबू केदार


कामठी :- कोरोना विषाणूंचा पादुर्भाव सर्वत्र पसरू नये यासाठी प्रशासणाचे वतीने सर्वत्र लॉक डॉऊन संचारबंदी केल्यामुळे शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य नागरिकाची दयनिय अवस्था झाली असून कोरोना संकटावर मात करण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असून खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना खरीप पेरणी साठी लागणारे बी बियाणे व खताची अडचण भासणार नाही याची संबंधित विभागाने दक्षता बाळगावी असे आव्हान राज्याचे क्रीडा व पशु संवर्धन मंत्री व भंडारा व वर्ध्याचे पालकमंत्री ना. सुनील केदार यांनी तालुक्यातील गुंमथळा येथील कल्पना इंडस्ट्रीज येथे आजपासून शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या कापूस खरेदी केंद्राच्या उदघाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना व्यक्त केले.

याप्रसंगी खासदार कृपाल तुमाणे, आमदार टेकचंद सावरकर, माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व कामठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हुकूमचंद आंमधरे , नागपूर जी प चे स्थायी समिती सदस्य प्रा अवंतिका लेकुरवाडे,जी प चे विरोधी पक्ष नेता अनिल निधान, पंचायत समिती कामठी चे सभापती उमेश रडके, उपसभापती आशिष मललेवार, पंचायत समिती सदस्य दिलीप वंजारी, पूनम माळोदे, गुंमथळा ग्रा प सरपंच रामभाऊ बोरकर, उपसरपंच वर्षा आगलावे, कामठी कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालक डुंमदेव नाटकर, मनोहर कोरडे, दिनेश ढोले,माजी जी प सदस्य विनोद पाटील , लक्ष्मण आमधरे ,नाना वाघ,नाना मंडलिक, अंबर वाघ,ज्ञानेश्वर वानखेडे, राजेंद्र लांडे, सचिन घारड , गोपाल तेलमासरे,भारत तेलमासरे, राजा वंजारी, बंटी तेलमासरे, राजेंद्र लांडे,चिंनू, यासह प्रशासकीय अधिकाऱ्यात एसडीओ श्याम मदनूरकर, तहसिलदार अरविंद हिंगे, बीडीओ सचिन सूर्यवंशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ अश्विनी फुलकर, तालुका कृषी अधिकारी मंजुषा राऊत आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

या कापूस खरेदी केंद्राचा शुभारंभ खापा येथील राजूरकर नामक शेतकऱ्याचा कापूस खरेदी करून करण्यात आली यानुसार आज एकाच दिवशी 500 च्या जवळपास कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यात आला.

कामठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कापूस पीक घेतले होते मात्र कोरोना विषाणूच्या पाश्वरभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन मुळे खाजगी जिनिंग बंद होत्या अशा परिस्थितीत कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या घरातच कापूस पडून राहला होता तर काही दलाल व छोटे व्यापारी फारच कमी दरात कापूस खरेदी करीत होते .अशा परिस्थितीत कापसाला भाव नाही, सरकारी खरेदि नाही अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी जगावे कसे अशा परिस्थितीची जाणीव राज्याच्या महाविकास आघाडी ने घेऊन महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ सेवा जिनिंग मालकाशी करारनामा केल्यावरुन कामठी तालुक्यातील गुंमथळा येथील कल्पना इंडस्ट्रीज येथे आज पासून कापूस खरेदी केंद्र चा शुभारंभ करण्यात आला.

या कापूस खरेदी केंद्र सुरू झाल्यामुळे आपल्या भागातील शेतकऱ्यांना याचा चांगलाच लाभ होईल व कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या कापसाला चांगलाच भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांत आनंदाची लहर दिसून येत होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक सभापती हुकूमचंद आमधरे यांनी केले तर संचालन राजेंद्र लांडे यांनी केले व आभार प्रदर्शन मनोहर कोरडे यांनी मानले

लोकडोउन मुळे सर्वत्र बंदी असल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या कापसाला मिळणारा भाव हा हमीभावाणे न मिळता परवड न्यासारखा नसल्या मुळे कापूस खरेदी ही पणन महासंघाने करावी यासाठी कामठी तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती हुकूमचंद आंमधरे, जी प चे विरोधी गट नेता अनिल निधान, प्रहार चे छत्रपाल करडंभाजने यांनी शासनाकडे केलेल्या मागणीला यश आले हे इथं विशेष!

संदीप कांबळे कामठी