Published On : Wed, Mar 2nd, 2022
By Nagpur Today Nagpur News

नागपूर महानगरपालिकेचा स्थापना दिवस संपन्न

Advertisement

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या ७१ व्या स्थापना दिवसानिमित्त म.न.पा.केन्द्रीय कार्यालयातील हिरवळीवर महापौर श्री.दयाशंकर तिवारी, सत्तापक्ष नेता श्री.अविनाश ठाकरे, आयुक्त श्री.राधाकृष्णन बी., नगरसेविका श्रीमती लक्ष्मी यादव यांनी प्रथम महापौर बॅरि.शेषराव वानखेडे यांच्या पूर्णाकृती पुतळयाला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी अपर आयुक्त दीपककुमार मीना, राम जोशी, उपायुक्त निर्भय जैन, सहा.आयुक्त महेश धामेचा, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी यांचेसह विविध विभागाचे अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.

नागपूर महानगरपालिकेची स्थापना २ मार्च, १९५१ रोजी झाली. त्यावेळी श्री.जी.जी.देसाई दि. ०१-०३-१९५१ ते ०३-०७-१९५१ पावेतो प्रशासक व त्यानंतर दि ०४-०७-१९५१ ते १०-०८-१९५२ पावेतो मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते.

बॅरि.शेषराव वानखेडे यांनी दि. २४-०७-१९५२ रोजी प्रथम महापौर म्हणून कार्यभार स्विकारला. ते १४-०१-१९५३ पावेतो महापौर पदी कार्यरत होते. त्यानंतर बॅरि.वानखेडे यांनी ९-०१-१९५४ ते १२.०५-१९५५ व १२-०५-१९५५ ते २४-०१-१९५६ याप्रमाणे सलग दोनवेळा महापौर पद भुषविले.

Advertisement

बॅरि.वानखेडे यांना शहराचे प्रथम महापौर तर त्यांची कन्या श्रीमती कुंदाताई विजयकर यांना दि.५-०२-१९९६ ते ९-०२-१९९९ पावेतो प्रथम महिला महापौर होण्याचा बहुमान मिळाला, पिता-पुत्रीने प्रथम महापौर पद भुषविणे हा म.न.पा.चे इतिहासात विलक्षण योगा-योग आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.