Published On : Wed, Jan 29th, 2025
By Nagpur Today Nagpur News

प्रत्येक जिल्ह्यात पाळीव प्राण्यांसाठी रुग्णालये तयार करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Advertisement

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पशुसंवर्धन विभागाच्या १०० दिवसांच्या योजनेअंतर्गत सह्याद्री अतिथीगृह येथे आढावा बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पाळीव प्राण्यांसाठी रुग्णालये स्थापन करण्याचे निर्देश दिले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, जखमी किंवा आजारी पाळीव प्राण्यांवर उपचार करण्यासाठी पशुसंवर्धन विभागात तज्ञ उपलब्ध आहेत.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात यासाठी रुग्णालय स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडावा. त्याचबरोबर पशुसंवर्धन विभागात रिक्त असलेल्या मनुष्यबळाच्या पदांवर लवकरच भरती करण्याच्या हालचाली सुरु कराव्यात, असे ते म्हणाले.

यावेळी त्यांनी पशुपालन व्यवसायाला कृषी व्यवसायाचा दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याबाबतही सांगितले.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.