Published On : Wed, Nov 26th, 2025
By Nagpur Today Nagpur News

विदर्भात निवडणूक प्रचारात उत्साह; सर्वांचा शिवसेनेला जोरदार पाठिंबा, एकनाथ शिंदेंचे विधान

Advertisement

नागपूर : आगामी निकाय निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विदर्भात दमदार प्रचार मोहीम राबवत आहेत. नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, “प्रचारादरम्यान नागरिकांचा उत्साह अविश्वसनीय आहे. महिला, तरुण, पुरुष—सर्वांचे शिवसेनेला अभूतपूर्व समर्थन मिळत आहे.”

शिंदे म्हणाले की, या निवडणुका विकासाच्या अजेंड्यावर लढवल्या जात आहेत. “लाडली बहिन” योजनेलाही प्रचंड प्रतिसाद मिळत असून महिलांमध्ये विशेष उत्सुकता दिसत असल्याचे त्यांनी सांगितले.

Gold Rate
26 Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,25,900 /-
Gold 22 KT ₹ 1,17,100 /-
Silver/Kg ₹ 1,58,600/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

त्यांच्या मते,कालपासून विदर्भातल्या अनेक सभांना भेट दिली. प्रत्येक ठिकाणी तरुण, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती प्रचंड होती. यावरून स्थानिक पातळीवर शिवसेनेच्या उमेदवारांना मिळणारा मजबूत पाठिंबा स्पष्ट दिसतो.”

शिंदे यांनी सांगितले की, जेव्हा ते मुख्यमंत्री होते, तेव्हाही विकासकामांसाठी निधी दिला गेला होता.
“जिथे आमचे महापौर नव्हते, तिकडेही पाणी, सांडपाणी, मैदान, उद्याने, आरोग्य सुविधा—या सगळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक महापालिकेला एक कोटी रुपयांचा निधीही दिला गेला,” असे त्यांनी नमूद केले.

लाडकी बहिन योजना बंद होणार नाही – लाडकी बहिन योजनेबाबत बोलताना शिंदे म्हणाले,ही योजना माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात सुरू झाली. महायुती सरकारचा हा संयुक्त निर्णय होता. महिलांच्या अडचणी आम्हाला माहिती आहेत. एकदा योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला, तर ती बंद करण्याचा प्रश्नच येत नाही. ही योजना सुरूच राहणार.”
छोट्या शहरांना मिळणार मोठा निधी-
मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विधानावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री म्हणाले.नगर परिषद व नगर पंचायतांचा विकास हा अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटचा विषय आहे. मोठ्या शहरांप्रमाणेच छोट्या शहरांनाही पुरेसा निधी मिळायला हवा. पूर्वी निधीअभावी छोट्या शहरांचा विकास अडकत होता, पण आता आम्ही यावर काटेकोरपणे लक्ष ठेवले आहे आणि मोठा निधी वितरित केला आहे.शिंदेंच्या दौऱ्यानंतर विदर्भात शिवसेनेला मिळणारा लोकसमर्थनाचा जोर स्पष्ट दिसत आहे.

Advertisement
Advertisement