Published On : Sat, Nov 12th, 2022
By Nagpur Today Nagpur News

“इंफ्रास्ट्रक्चर क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध” – डॉ. बिजेश दीक्षित

नागपूर : नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ कंस्ट्रक्शन मॅनेजमेंट (NICMRA), पुणे यांच्या पदवी प्रदान समारंभा मध्ये मुख्य अतिथी म्हणून डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी आज दिनांक ११/११/२०२२ रोजी विद्यार्थ्यांना मार्गर्दर्शन केले. NICMAR हि संस्था कंस्ट्रक्शन मॅनेजमेंट या विषयी पदव्यूत्तर कोर्सेस चालवते.

मेट्रो प्रकल्प हा पुण्यातील एक अत्यंत्य महत्वाकांक्षी प्रकल्प असून कंस्ट्रक्शन मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी साईट विझीट आणि इंटर्नशिपच्या माध्यमातून मोठ्या प्रकल्पातील तांत्रिक बाबींची माहिती घेतलीआहे. पुणे मेट्रोच्या बांधकामाची तांत्रिक माहिती साईट व्हिझिटद्वारे आत्तापर्यंत १२०० इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी घेतली आहे. तसेच ३०० च्यावर इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पुणे मेट्रोमध्ये इंटर्नशिप ट्रेनींग घेतले आहे.

Gold Rate
14 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,200 /-
Gold 22 KT ₹ 93,200 /-
Silver/Kg ₹ 1,16,100/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

आज दिनांक ११/११/२०२२ रोजी NICMAR येथील पदवी प्रदान सोहळ्यांला डॉ. ब्रिजेश दीक्षित हे प्रमुख पाहुणे, श्री. अजित गुलाबचंद, मुख्य ट्रस्टी, NICMAR आणि श्री. अनिल कश्यप, डायरेक्टर जनरल, NICMAR हे उपस्थित होते. या प्रसंगी डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी विद्यार्थ्यांना मार्गर्दर्शन केले.

डॉ.दीक्षित म्हणाले की,”भारतातील इंफ्रास्ट्रक्चर प्रकल्पांची अंमलबजावणी करताना प्रोजेक्ट मॅनेजमेंटचा योग्य तो उपयोग न केल्यामुळे प्रकल्प योग्य वेळेत आणि नियोजित किमतीमध्ये पूर्ण करणे शक्य होत नाही. प्रोजेक्ट मॅनेजमेंट/ कंस्ट्रक्शन मॅनेजमेंट मध्ये मोठ्या प्रमाणावर डिजिटायझेशन आणि IT चा वापर अनिवार्य झाला आहे. IT तंत्रज्ञानाचा वापर करूनच संपूर्ण प्रोजेक्टचे डिजिटल ३D मॉडेल बनवण्यात येऊन प्रकल्पाचे मॉनिटरिंग अत्यंत्य प्रभावीपणे राबवणे शक्य झाले आहे. पुणे आणि नागपूर प्रकल्प राबवताना 5D BIM (Five Dimensional Building Information Modeling) या तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे प्रकल्प प्रभावीपणे राबवणे शक्य झाले आहे.

इंफ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टची अंमलबजावणी करताना त्यामध्ये बहूशाखीय, विविध इंजिनिअरिंग शाखांच्या ज्ञानाची गरज पडते. त्यामुळे टीम वर्क शिवाय अश्या कामांची प्रभावीपणे अंमलबजावणी करता येत नाही.” डॉ. दीक्षित पुढे म्हणाले की, “भारताचा विकास अत्यंत्य वेगाने सुरुअसून येत्या काही वर्षात भारत ५ ट्रिलियन अर्थव्यवस्थेचा देश बनणार आहे आणि जागतिक अर्थव्यवस्थेच्या क्रमवारीने तिसरा देश बनेल. हा विकास दर गाठण्यासाठी इंफ्रास्ट्रक्चर क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक सुरु असून कंस्ट्रक्शन मॅनेजमेंट, प्रोजेक्ट मॅनेजमेंट या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. आज NICMAR मधून पदवी घेतलेलया विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे आणि या बदलत्या भारतामध्ये त्यांना योगदान करण्याची संधी उपलब्ध होणारआहे.”

Advertisement
Advertisement