Published On : Wed, Dec 26th, 2018

मनसर टोल नाका स्थलांतरणाच्या कामास गती ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Advertisement

नागपूर जिल्हयातील रामटेक येथील मनसर टोल नाका खवासा सीमेकडे स्थलांतरित करण्याचा निर्णय 29 ऑक्टोबर 2018 रोजी परिवहन भवन येथे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता. आजच्या बैठकीत यासाठी आवश्यक सहकार्य महाराष्ट्र शासनाकडून देण्यात येणार असल्याचे श्री.बावनकुळे यांनी सांगितले त्यानुसार या टोल नाका स्थलांतरणाच्या कामाला गती येणार आहे. यामुळे रामटेक येथे दर्शनासाठी येणारे भाविक आणि येथील स्थानिक शेतक-यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे श्री. बावनकुळे यांनी सांगितले.

पाटणसावंगी-सावनेर रस्त्यावरील टोलनाका बैतुलकडे स्थलांतरित करणे, नागपूर -सावनेर रस्त्यावर चिन्हीत ’11.285’ या अपघात प्रवण स्थळावर उड्डानपूल बांधणे आणि राष्ट्रीय महामार्ग क्र.47 वरील कोराडी महालक्ष्मी मंदिर भागात उड्डानपूल बांधण्याच्या कामाचा आढावा घेण्यात आला तसेच येथील अपघात प्रवण स्थळावर सुरक्षेच्या पुरेशा उपाय योजना करण्याच्या कामाला गती देण्याच्या सूचना यावेळी श्री. गडकरी यांनी उपस्थित अधिका-यांना केल्या.

याबैठकीत नागपूर -भंडारा 6 पदरी रस्ता, अमरावती जिल्हयातील नांदगाव पेठ टोल नाका, औरंगाबाद शहरातून जाणारा चिखलठाणा –नगर नाका 14 कि.मी.चा रस्ता, जळगाव शहरातून जाणा-या राष्ट्रीय महामार्ग क्र.6 वरील कामे, मिरज शहर रस्ता, अमरावती- चिखली रस्ता आदि प्रकल्पांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.