Published On : Fri, Aug 5th, 2022
By Nagpur Today Nagpur News

राज्यात ९७ हजार ४४३ बूथवर सक्षमीकरण अभियान राबविणार

Advertisement

माजी ऊर्जामंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे : भाजप कार्यकर्ता हर घर झेंडा अभियानांतर्गत झेंडा उपलब्ध करून देणार

नागपूर : भाजप राज्यात बूथ सक्षमीकरण अभियान राबविणार आहे. एका बुथवर ३० कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात येईल. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या ‘हर घर झेंडा’ उपक्रमाअंतर्गत भाजप कार्यकर्ते घरोघरी राष्ट्रध्वज उपलब्ध करून देणार असल्याचे माजी ऊर्जामंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सांगितले.

राज्यात 97 हजार 443 बूथ आहेत. प्रत्येक बूथव 30 प्रमुख कार्यकर्त्यांची नियुक्ती केली जाणार आहे. नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भाजपच्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. प्रदेश भाजप कार्यकारिणीची बैठक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह 900 प्रतिनिधींच्या उपस्थितीत पार पडल्याचे आमदार बावनकुळे यांनी सांगितले.

आता राज्यभरातील जिल्ह्यातील हजार पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी महिनाभरात जाहीर होईल, त्यानंतर तालुकास्तरावर जाहीर केली जाईल. यातून बूथ सक्षमीकरण अभियान राबविण्यात येणार असल्याचे आमदार बावनकुळे यांनी नमुद केले. याशिवाय हर घर झेंडा अभियानांतर्गत भाजप कार्यकर्ते प्रत्येक घरी झेंडा उपलब्ध करून देतील. 13 ते 15 ऑगस्टदरम्यान भाजप कार्यकर्ता संपूर्ण राज्यभर ही मोहिम राबविणार आहे. बूस्टर डोससाठी राज्य व केंद्र सरकार प्रयत्न करीत आहे. परंतु भाजप कार्यकर्तेही या मोहिमेत भाग घेणार आहे. भाजपने नेहमीच जनहिताला प्राधान्य देत संघटनावर भर दिला आहे. ही नेहमीची प्रक्रिया असल्याचे ते म्हणाले.

Advertisement

राज्यात निवडणूक झाली तरी भाजप सज्ज
कोणत्याही निवडणुकीसाठी भाजप सज्ज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी चारशेवर लोकसभेच्या जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. त्यादृष्टीने तसेच राज्यातही निवडणूक झाल्यास भाजप सज्ज असल्याचे माजीमंत्री आमदार बावनकुळे म्हणाले.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.