Published On : Sat, May 2nd, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूरच्या सीताबर्डीतील फॉर्च्यून मॉलमध्ये लिफ्टमध्ये बिघाड; काच फोडून नागरिकांची सुटका

Advertisement

नागपूर : सीताबर्डी परिसरातील फॉर्च्यून मॉलमध्ये लिफ्ट अचानक बंद पडल्याने मोठी धांदल उडाली. या घटनेत सुमारे पाच ते सहा नागरिक लिफ्टमध्ये अडकून पडले होते. बराच वेळ लिफ्टमध्ये अडकून राहिल्यामुळे आत असलेल्या लोकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि घुसमट जाणवू लागली.

माहितीनुसार, अडकलेल्या नागरिकांनी वारंवार मॉल प्रशासनाकडे मदतीची मागणी केली. मात्र, सुरुवातीला कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने परिस्थिती अधिकच गंभीर झाली. लिफ्टमधील लोकांची प्रकृती खालावत असल्याचे लक्षात येताच बाहेर उपस्थित नागरिकांनी संताप व्यक्त केला.

नागरिकांच्या तीव्र विरोधानंतर अखेर मॉल प्रशासनाने लिफ्टची काच फोडण्याचा निर्णय घेतला. काच फोडून सर्व अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

या प्रकारानंतर मॉलमधील सुरक्षा यंत्रणा आणि आपत्कालीन व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. स्थानिक नागरिकांनी या निष्काळजीपणाबद्दल संताप व्यक्त करत जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.