Published On : Fri, Aug 11th, 2023
By Nagpur Today Nagpur News

१७ ते ३१ ऑगस्ट दरम्यान हत्तीरोग समूळ दुरीकरण मोहिम

- टास्क फोर्सच्या बैठकीत अतिरिक्त आयुक्तांनी घेतला तयारीचा आढावा
Advertisement

नागपूर :नागपूर महानगरपालिकेच्या हिवताप व हत्तीरोग विभागातर्फे हत्तीरोग जनजागृती अंतर्गत १७ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२३ दरम्यान शहरात हत्तीरोग दुरीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत मनपाचे आरोग्य चमू घरोघरी जाऊन पात्र सर्व व्यक्तींना गोळ्या वाटप करणार आहे, तसेच हत्तीरोग संदर्भात जनजागृती करणार आहे. मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी टास्क फोर्सच्या बैठकीत हत्तीरोग दुरीकरण मोहिमेच्या तयारीचा आढावा घेतला. तसेच सर्व नागरिकांनी मनपाच्या आरोग्य चमूकडून गोळ्यांचे सेवन करून हत्तीरोग समूळ दुरीकरण करण्यासाठी मनपाला सहकार्य करावे, असे आवाहन केले.

हत्तीरोग समूळ दुरीकरण मोहिमेची रूपरेषा ठरविण्यासाठी शुक्रवारी (ता. ११) मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील अतिरिक्त आयुक्तांच्या सभाकक्षात टास्क फोर्स समितीची बैठक पार पडली. याप्रसंगी मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल, मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, जागतिक आरोग्य संघटनेच्या समन्वयक डॉ. भाग्यश्री त्रिवेदी, हिवताप व हत्तीरोग अधिकारी डॉ. मंजुषा मठपती, आय डी ए चे नोडल अधिकारी डॉ. कार्लेकर, झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रिती झरारिया, डॉ. देवस्थळे, यांच्यासह इतर झोनल वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, शिक्षण विभागाचे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.

Gold Rate
13 Jan 2026
Gold 24 KT ₹ 1,41,000/-
Gold 22 KT ₹ 1,31,100 /-
Silver/Kg ₹ 2,64,000/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यावेळी अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी १७ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२३ दरम्यान लक्ष्मीनगर झोन, धरमपेठ झोन, हनुमाननगर झोन, धंतोली झोन, नेहरूनगर झोन या झोनमध्ये राबविण्यात येणाऱ्या हत्तीरोग समूळ दुरीकरण मोहिमेत आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांनी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांनी संपूर्ण सहभाग नोंदवावा असे निर्देश दिले. तसेच आरोग्य विभागातील कर्मचा-यांनी कसे काम करावे तसेच १ ते ५ झोनमध्ये आय.डी.ए. कार्यक्रम कसा राबवावा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत वाटण्यात येणाऱ्या गोळ्या प्रत्यक्ष त्यांच्यासमोर खाऊन मोहिम यशस्वी करण्याकरिता जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी केले

१७ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२३ दरम्यान हत्तीरोग समूळ दुरीकरण मोहीम राबविण्यात येणार असून, जनजागृती करण्याकरिता लक्ष्मीनगर झोन, धरमपेठ झोन, हनुमाननगर झोन, धंतोली झोन, नेहरूनगर झोन या झोनमध्ये ६२४ जनजागृती बूथ लावण्यात येणार आहे. तसेच ५६७ चमूच्या माध्यमातून घरोघरी गोळ्या वितरित करण्यात येणार आहे. नागरिकांनी सहकार्य करीत मोहिम यशस्वी करावी असे आवाहन हिवताप व हत्तीरोग विभागाद्वारे करण्यात आले आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement