Published On : Wed, Feb 26th, 2020

इलेक्ट्रॉनिक उपकरण गोदामाला अकस्मात लागlली आग,

आगीत लाखोंच्या साहित्याचे नुकसान

कामठी :-स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या फेरूमल चौकातिल दरोगा मस्जिद जवळील विशाल ट्रेडर्स नामक अप टू डेट इंटरप्रयझेस दुकानाच्या इलेक्ट्रोनिक उपकरणाच्याअ दुकानाला भरदिवसा दुपारी अडीच दरम्यान अचानक आग लागल्याची घटना घडली . आगीत लाखो रुपये किमतीच्या इलेक्ट्रॉनिक साहित्याचे नुकसान झाले मात्र सुदैवाने जीवितहानी टळली

Gold Rate
14 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,200 /-
Gold 22 KT ₹ 93,200 /-
Silver/Kg ₹ 1,16,100/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

घटनेची माहिती मिळताच जुनी कामठी पोलिसांसह परिसरातील नागरिकांनी मदतीची धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला तोवर नगर परिषद चे अग्निशमन वाहन पोहोचून आग आटोक्यात आणण्यात यश गाठले.या आगीत मोठं मोठ्या टीव्ही, वाशिंग मशीन यासारखे लाखो रुपये किमतीचे साहित्याचे नुकसान झाले .पोलिसानी यासंदर्भात फिर्यादी दुकानदार इफतेकार नासिर यजदानी यांनी पोलीस स्टेशन ला दिलेल्या माहिती वरुन तक्रारीची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

संदीप कांबळे

Advertisement
Advertisement