Published On : Fri, Mar 23rd, 2018

रविवारी अमरावती रोड परिसरातील वीज बंद राहणार

Representational pic


नागपूर: महावितरण कडून अमरावती रोड ,तेलंगखेडी आणि शंकर नगर परिसरातील वीज पुरवठा देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी रविवार दिनांक २५ मार्च रोजी बंद ठेवण्यात येणार आहे. महावितरणकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सकाळी ७ ते दुपारी १ या कालावधीत अमरावती रोड येथील हिंदुस्थान कॉलनी, मरार टोळी , तेलंगखेडी, गोंड वस्ती, राम नगर परिसर, विद्यापीठ परिसर, हिल टॉप, माऊंट कॅस्टल, अंबाझरी उद्यान, देवतळे ले आऊट, वर्मा ले आऊट, पांढराबोडी अंबाझरी टेकडी, कर्नाटक सभागृह,टिळक नगर, गोरेपेठ,गिरीपेठ, वेस्ट हायकोर्ट रोड, लक्ष्मी भवन चौक परिसर, वसंतराव नाईक झोपडपट्टी, आंबेडकर नगर धरमपेठ येथील वीज पुरवठा बंद राहणार आहे.

वरील कालावधीत वीज ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी महावितरणकडून गोरेवाडा वीज उपकेंद्रातून काही भागात वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. अशी माहिती महावितरणचे काँग्रेस नगरचे कार्यकारी अभियंता कुंदन भिसे यांनी दिली आहे. महावितरणकडून वीज ग्राहकांना नोंदणीकृत मोबाईलवर याची माहिती देण्यात आली आहे.