Advertisement
नागपूर: शहरात रविवारी रात्री नऊ वाजता सुमारास थरारक घटना घडली आहे. टिमकीमध्ये आईवडिलांना शिवीगाळ केल्याच्या कारणावरून वाद झाल्यानंतर मोठ्या भावाने लहान भावाच्या गळ्यावर चाकूने वार करून खून केला.
या प्रकरणी तहसील पोलिसांनी आरोपी भावावर गुन्हा दाखल करून अटक केली.गौरव ऊर्फ गुड्डू सुरेश गोखले (३६, टीमकी, किमाबाई पेठ) असे मृत युवकाचे नाव आहे. तर आरोपी दिलीप गोखले (४०) असे आरोपी भावाचे नाव आहे.
माहितीनुसार, दिलीप हा दारुडा असून बेरोजगार आहे. तो रविवारी रात्री नऊ वाजता घरी आला. त्याने आई-वडिलांना शिवीगाळ करून पैशाची मागणी केली. यादरम्यान लहान भाऊ गौरव याने भावाला शिवीगाळ करण्यावरून रोकले. त्यांच्यात वाद झाला.
त्यानंतर दिलीपने गौरवच्या गळ्यावर चाकूने वार केला. जागेवरच त्याचा जीव गेला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.