
बारामती: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनाने संपूर्ण राज्य शोकमग्न झाले असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी बारामती येथे अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांनी पवार कुटुंबीयांचे सांत्वन केले.
या भेटीचा फोटो समोर आला असून, त्या छायाचित्रात मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदे सुनेत्रा पवार यांच्याशी संवाद साधताना दिसत आहेत. या प्रसंगी वातावरण अत्यंत भावूक होते.
अजित पवार यांच्या आकस्मिक निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. एक कर्तव्यदक्ष, निर्णयक्षम आणि जनतेशी नाळ जुळवणारे नेतृत्व हरपल्याची भावना राज्यभर व्यक्त केली जात आहे.
या दु:खाच्या काळात राज्यातील विविध नेते, कार्यकर्ते आणि नागरिक पवार कुटुंबाच्या पाठीशी उभे असल्याचे चित्र दिसत आहे.








