Published On : Sat, May 11th, 2024
By Nagpur Today Nagpur News

एकनाथ शिंदेना आमच्यामुळे आमदारकी मिळाली;विनायक राऊतांचा गौप्यस्फोट

Advertisement

ठाणे: बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते विनायक राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल करत मोठा गौप्यस्फोट केला आहे. माझ्या आणि राजन विचारे यांच्या विनंतीवरून बाळासाहेब ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना आमदारकीचे पहिले तिकीट दिले.

नाहीतर त्यावेळी शिवसेनेचे नेते सतीश प्रधान यांना आमदारकीची उमेदवारी देण्यात येत होती, असा दावा राऊत यांनी केला.

Gold Rate
Feb20 th, 2026 - Time 11.45Hrs
Gold 24 KT ₹ 1,54,400 /-
Gold 22 KT ₹ 1,44,500 /-
Silver/Kg ₹ 2,47,200 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातील कोपरी भागात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे लोकसभेचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत राऊत बोलत होते.

शिवसेना फोडणार्‍यांच्या कपाळावर गद्दारीचा शिक्का मारला जाणार असून पुढची पिढीदेखील त्यांना माफ करणार नसल्याची टीकाही राऊत यांनी केली. या सभेला आमदार जितेंद्र आव्हाड, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यासह इंडिया आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement