ठाणे: बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते विनायक राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल करत मोठा गौप्यस्फोट केला आहे. माझ्या आणि राजन विचारे यांच्या विनंतीवरून बाळासाहेब ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना आमदारकीचे पहिले तिकीट दिले.
नाहीतर त्यावेळी शिवसेनेचे नेते सतीश प्रधान यांना आमदारकीची उमेदवारी देण्यात येत होती, असा दावा राऊत यांनी केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातील कोपरी भागात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे लोकसभेचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत राऊत बोलत होते.
शिवसेना फोडणार्यांच्या कपाळावर गद्दारीचा शिक्का मारला जाणार असून पुढची पिढीदेखील त्यांना माफ करणार नसल्याची टीकाही राऊत यांनी केली. या सभेला आमदार जितेंद्र आव्हाड, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यासह इंडिया आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
Nagpur Protest: Protesters Sing National Anthem During Police Detention | Samvidhan Chowk...
nagpur student protest delhi lathi charge
प्लेट हटाने को कहा तो भड़के पड़ोसी! #NagpurNews #CrimeNews #LatestNews #news #Attack...
चाकू की नोक पर लूटपाट! #NagpurNews #CrimeNews #LatestNews #NewsUpdate #Police #KnifeAttack #Robbery
लकड़गंज में दिनदहाड़े चोरी की कोशिश नाकाम #NagpurNews #Crime #Theft #Chor #HindiNews...
कन्हान में नशे की ‘काली दुकान’ पर पुलिस का छापा! #NagpurNews #Drug...





