Published On : Sat, Oct 27th, 2018

नागपुरातील जुगार अड्डयावरील धाडीत डॉक्टरसह अडकले ८ जण

नागपूर : गिट्टीखदानमधील पेन्शननगरात एका दूध डेअरीच्या वर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर शुक्रवारी रात्री पोलिसांनी छापा मारला. या छाप्यात पोलिसांना जुगार खेळणारे आठ जण सापडले. त्यांच्याकडून रोख १८ हजार, ८ मोबाईल आणि दोन मोटरसायकल जप्त केल्या.

परिमंडळ दोनच्या उपायुक्त पथकाने तसेच गिट्टीखदान पोलिसांनी संयुक्तपणे शुक्रवारी रात्री ९ च्या सुमारास ही कारवाई केली.

पोलिसांनी पकडलेल्या जुगाऱ्यांमध्ये एक होमिओपॅथी डॉक्टर असल्याचेही सूत्रांकडून कळले. वृत्त लिहिस्तोवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.


त्यामुळे आरोपींचे नाव पोलिसांकडून कळू शकले नाही.