Published On : Mon, Jun 17th, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना मद्यधुंद कारचालकाने चिरडले,दोघांचा मृत्यू

Advertisement

नागपूर : राज्याच्या उपराजधानीत हिट अँड रन प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे.सोमवारी मध्यरात्री वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिघोरी चौकाजवळ अशाच प्रकाराचा भीषण अपघात घडला. सोमवारी मध्यरात्री एका वेगवान कारचालकाने फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना चिरडले. त्यात दोघांचा मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी आहेत.भूषण लांजेवार असे आरोपी कारचालकाचे नाव असून त्याला अटक करण्यात आली.

‘नागपूर टुडे’ने या अपघातासंदर्भात वाठोडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विजय दिघे यांच्याशी संवाद साधला.आरोपी हा विद्यार्थी असून त्याचे नाव भूषण लांजेवार आहे.

Gold Rate
July 02 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 43,100 /-
Gold 22 KT ₹ 1,32,800 /-
Silver/Kg ₹ 2,30,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

अपघातादरम्यान तो मद्यधुंद अवस्थेत असून भरधाव कार चालवत होता. या घटनेची माहिती मिळताच वाठोडा पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले. सर्व जखमींना उपचारासाठी मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून फरार झाला होता. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून लगेच शोधमोहीम राबविली. त्यानंतर कारचालक भूषण लांजेवार याला अटकन आली. तसेचपोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.

माहितीनुसार, हा अपघात घडला तेव्हा फुटपाथवर काही लोक झोपले होते. हे लोक रस्त्यावर खेळणे विकून उदरनिर्वाह करणारे लोक होते व त्यात महिला-मुलांचादेखील समावेश होता. उमरेड मार्गाकडे जाणाऱ्या भरधाव कारच्या चालकाचे नियंत्रण सुटले व कार थेट फुटपाथवर चढली. कार तीन महिला, चार मुले व एका पुरुषाच्या अंगावरच गेली. यामुळे जोरदार आवाज झाला व एका महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर दुसऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.या घटनेनमुळे परिसरात खळबळ उडाली होती.

Advertisement
Advertisement
स्मार्ट मीटर के खिलाफ प्रहार का आंदोलन #maharashtranews #smartmeter #andolan #electricitybill

स्मार्ट मीटर के खिलाफ प्रहार का आंदोलन #maharashtranews #smartmeter #andolan #electricitybill

1.53 करोड़ की शिवशाही बस बरामद #maharashtranews #crime #latestnews #accusedarrested #shivshahi #bus

1.53 करोड़ की शिवशाही बस बरामद #maharashtranews #crime #latestnews #accusedarrested #shivshahi #bus

Sehat ki baat -  Nitin Shinde Episode - 7

Sehat ki baat - Nitin Shinde Episode - 7

ASTROLOGY/WEEKLY RASHIFAL - Abhishek Soni EPISODE - 8

ASTROLOGY/WEEKLY RASHIFAL - Abhishek Soni EPISODE - 8

नागपुर में रिश्वतखोर हेड कांस्टेबल एसीसी के जाल में... #nagpurnews #crime #anticurreption #raid

नागपुर में रिश्वतखोर हेड कांस्टेबल एसीसी के जाल में... #nagpurnews #crime #anticurreption...

जाति प्रमाणपत्र रद्द, राजनीति में मचा भूचाल #maharashtranews #politicsnews #jatipramanpatra #news

जाति प्रमाणपत्र रद्द, राजनीति में मचा भूचाल #maharashtranews #politicsnews #jatipramanpatra #news

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges