Published On : Fri, Jul 10th, 2020

देवलापार जुगार खेळतांना आठ जणांना रंगेहात अटक

दोन लाखाचा मुद्देमाल जप्त, देवलापार पोलिसांची कारवाई

रामटेक :- पोलीस स्टेशन पासून काही अंतरावर सुरू असलेला जुगार अड्याची गुप्त माहीत मिळताच ठाणेदारांनी आपल्या सहकार्यासोबत जुगार अडा गाठून जुगार सुर असलेल्या ठिकाणी धाड घालून खेळत असतांना घटनास्थळावरून आठ जणांना पोलिसांनी रंगेहात अटक केली.यावेळी घटनास्थळवरून अंदाजे २लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही धाड नुकतीच – देवलापारचे ठाणेदार प्रवीण बोरकुटे यांनी घातली.

सदर जुगार अड्डा अनेक दिवसांपासून भर वस्तीत रस्त्यावर जोनपूरकर यांचे घरी बिनधोकपणे सुरू असल्यासची पोलिसांना शंका होतीच.पण काल ठाणेदार प्रवीण बोरकुटे यांना या अड्ड्याबाबत गुप्त माहिती प्राप्त झाल्याने ठाणेदारांनी आपल्या सहकार्यासोबत हा जुगार अडा गाठून जुगार सुर असलेल्या ठिकाणी धाड घातली यावेळी घटनास्थळावरून आठ जणांना पोलिसांनी रंगेहात अटक केली..आरोपीच्या ताब्यातुन बजाज सीटी,पाण्याची कॅन एक हजार रुपये व वेगवेगळ्या कंपनीचे सात मोबाईल,५२ तासपत्त्यासहीत असा एकुण १लाख९९हजार सातशे चाळीस रुपयाचा मुद्देमाल घटनास्थळावरून जप्त करण्यात आला.महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक मोनीका राऊत,उपविभागीय पोलीस अधिकारी रामटेक नयन आलुरकर यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार प्रवीण बोरकुटे करीत आहे.