Published On : Thu, Jan 3rd, 2019

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची चंद्रशेखर धर्माधिकारी यांना श्रध्दांजली

नागपूर:जेष्ठ गांधीवादी विचारवंत आणी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमुर्ती दिवंगत चंद्रशेखर धर्माधिकारी यांना शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले व श्रध्दांजली वाहीली.

यावेळी गांधीवादी विचारवंत न्यायमुर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या कार्याचा आढावा शिक्षणमंत्र्यांनी घेतला.आणीबाणीच्या काळात न्यायमुर्ती धर्माधिकारी यांनी नैसर्गीक न्यायाच्या तत्वाचा आधार घेत अनेक सत्याग्रहींच्या याचिका दाखल करून घेतल्याने त्या सत्याग्रहीतील बरेच जण निर्दोष सुटल्याची आठवण ही शिक्षणमंत्र्यांनी जागवली.राज्यातील डान्सबार बंदी संदर्भात त्यांच्या नेतृत्वात नियुकत समीतीच्या अहवालानुसार डान्स बार बंदी करण्यात आली असल्याचे ही त्यांनी यावेळी सांगीतले.दिवंगत न्यायमुर्तीच्या आठवणींना त्यांनी यावेळी उजाळा दिला.

यावेळी श्री.तावडे यांनी त्यांचे जेष्ठ चिरंजीव न्यायमुर्ती सत्यरंजन धर्माधिकारी व अन्य कुटुंबियांचे सात्वंन केले. यावेळी त्यांच्या सोबत आमदार अनिल सोले, सत्तापक्ष नेते महानगरपालीका संदीप जोशी उपस्थित होते.