Published On : Wed, Jan 3rd, 2018

अभ्यासू व्यक्तिमत्त्व हरपले : पालकमंत्री बावनकुळे

Advertisement

Maharashtra Energy Minister Chandrashekhar Bawankule
नागपूर: जिल्ह्याच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते व अभ्यासू व्यक्तिमत्त्व असलेले अ‍ॅड. मधुकरराव उर्फ मामा किंमतकर यांच्या निधनामुळे विदर्भातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व हरपले असल्याची शोकसंवेदना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली आहे.

मामा किंमतकर यांनी विदर्भातील अनुशेषाचा आवाज विधिमंडळात बुलंद केला होता. सिंचन, रस्ते, कृषी पंप आदी विषयांचा त्यांनी प्रचंड अभ्यास करून विदर्भाचा व जिल्ह्याचा विकासाचा अनुशेष दूर करण्यास मदत केली. त्यांचा अभ्यास व संशोधन वृत्तीची दखल घेत तत्कालीन मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले व वसंतदादा पाटील यांनी आपल्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून त्यांचा समावेश केला होता.

1992 मध्ये म्हाडाच्या अध्यक्षपदावर त्यांची नियुक्ती झाली होती. राज्यपालांनी तयार केलेल्या विदर्भ वैधानिक मंडळावर त्यांची तज्ञ म्हणून नियुक्ती करण्यात आली. आजपर्यंत ते या मंडळावर सदस्य म्हणून होते. त्यांच्या निधनाचे वृत्त दु:खद असून त्यांच्या जाण्यामुळे विदर्भ आणि नागपूर जिल्ह्याचे न भरून निघणारे नुकसान झाले असल्याची भावनाही पालकमंत्री बावनकुळे यांनी व्यक्त केली आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement