मुंबई : लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस 16’ मधून सगळ्यांची मने जिंकणारा अभिनेता शिव ठाकरे आणि अब्दु रोजिक यांना अंमलबजावणी संचलनालय (ईडी)ने समन्स बजावले आहे. या दोघांनाही हाय प्रोफाइल मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये साक्ष देण्यासाठी बोलावण्यात आले होते.
हे प्रकरण कथित ड्रग्स माफिया अली असगर शिराजी संबंधीत असल्याचे म्हटले जाते. रिपोर्ट्नुसार, या प्रकरणात साक्षीदार म्हणून दोघांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. रिपोर्ट्सनुसार, अली असगर शिराजीची हसलर्स हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी होती. त्याशिवय ही कंपनी अनेक वेगवेगळ्या स्टार्ट-अप्सला फायनॅन्स करायची. यापैकी एक शिव ठाकरेचे फूड अॅन्ड स्नॅक्स रेस्टॉरंट ‘ठाकरे चाय अॅन्ड स्नॅक्स’ आहे. त्याशिवाय अब्दु रोजिकचे फास्ट फूड स्टार्टअप ‘बुर्गीर’ ब्रॅँड देखील आहे.
कथितरित्या अलीच्या या कंपनीने नार्को- फंडिगच्या मदतीने पैसे कमावले. हे पैसे हसलर्स हॉस्पिटॅलिटीच्या माध्यमातून इन्वेस्टमेंट म्हणून त्यांना देण्यात आली. दरम्यान, शिराजीने कथितपणे स्टार्ट-अपमध्ये खूप इन्वेस्टमेंट केली होती.
शिव ठाकरेचा या प्रकरणी साक्षीदार म्हणून जबाब नोंदवण्यात आला आहे. त्याचबरोबर ईडीने त्याचा बिग बॉस 16 चा सह-स्पर्धक असलेला अब्दू रोजिकला हजर राहण्याचे आदेश दिले होते.
याप्रकरणी शिव ठाकरेनं खुलासा केला की 2022-23 मध्ये त्यांची भेट एका कोणत्या मार्गानं हसलर्स हॉस्पिटॅलिटीचा संचालक क्रुणाल ओझाशी झालं होतं. क्रुणालनं त्याला ‘ठाकरे चहा आणि स्नॅक्स’साठी पार्टनरशिप डीलची ऑफर केली होती. ‘करारानुसार, हसलर्स हॉस्पिटॅलिटीनं ‘ठाकरे चहा आणि स्नॅक्स’मध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती. शिव ठाकरेनं ईडीला सांगितलं की जेव्हा त्यानं त्याच्या स्टार्टअपसाठी आर्थिक मदत मागितली तेव्हा तो शिराजी यांना भेटला नव्हता किंवा त्याच्याबद्दल शिवाला काही माहितीही नव्हती.