Published On : Sat, Jun 22nd, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपूरसह 35 ठिकाणी अमटेक ग्रुपवर ईडीचे छापे;तपास यंत्रणा रॉबर्ट वड्रा,गांधी कुटुंबाला लक्ष्य करत आहे का?

Advertisement

नागपूर: अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नुकतेच नागपूरसह 35 ठिकाणी अमटेक ग्रुपवर छापेमारी केली आहे. 20 हजार कोटी रुपयांच्या बँक फसवणुकी प्रकरणी ही छापेमारी करण्यात आली. या छापेमारीवरून तपास यंत्रणा अप्रत्यक्षपणे वड्रा,गांधी कुटुंबाला लक्ष्य करत आहे का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

अमटेक ग्रुप चालवण्यामागे रॉबर्ट वड्रा यांचा हात असल्याची चर्चा-
अमटेक समूहाने बीएस इस्पातचे अधिग्रहण केले होते, मोहन अग्रवाल यांनी समूहाशी कराराची वाटाघाटी केली होती. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वड्रा हेच अमटेक ग्रुप चालवण्यामागे खरी ताकद असल्याची अफवा पसरल्याने त्या वेळी या प्रकरणाकडे लक्ष वेधले गेले होते. असे मानले जात होते की गांधी घराण्याने अप्रत्यक्षपणे समूहावर नियंत्रण ठेवले होते आणि वड्रा कंपनीशी जोडलेले होते.

20,000 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंगच्या आरोपावरून अमटेक ग्रुपवर ही कारवाई करण्यात आली आहे. ईडीने कंपनीच्या दिल्ली, गुडगाव, नोएडा, मुंबई आणि नागपूर येथील परिसरांवर छापे टाकले. एमटेक समूहाच्या प्रवर्तकांवर 20 हजार कोटी रुपयांच्या कथित बँक कर्ज फसवणुकीचा आरोप आहे.

माहितीनुसार, मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (PMLA), ईडीने एमटेक समूहाच्या गुरुग्राम, नोएडा, मुंबई आणि नागपूरसह अनेक ठिकाणी छापे टाकले. सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (CBI) ने एमटेक ग्रुप कंपनीच्या एसीआयएल लिमिटेडबद्दल प्रथम माहिती अहवाल दिला होता. यानंतर संबंधित फसवणुकीची चौकशी करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. ईडीने सीबीआय एफआयआरच्या आधारे आणि फसवणुकीच्या तपासासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तपास सुरू केला. त्यानंतर बँकांकडून घेतलेल्या कर्जाचा वापर नवीन उद्योग, रिअल इस्टेट आणि परदेशी गुंतवणुकीसाठी केल्याचे ईडीच्या तपासात उघड झाले.

Advertisement

कंपन्यांच्या शेअर्समध्ये फेरफार झाल्याचा आरोप-
ईडीच्या तपासात समोर आले की, बनावट विक्री, भांडवली मालमत्ता, कर्जदार आणि नफा अशा प्रकारे दाखवण्यात आला की, एनटेकला एनपीए मिळू नये म्हणून ते अधिक कर्ज घेऊ शकतात. त्यामुळे सूचीबद्ध कंपन्यांच्या शेअर्समध्ये फेरफार झाल्याचा आरोप ईडीने केला आहे. शेल कंपन्यांच्या नावावर एक हजार कोटींची मालमत्ता जमा करण्यात आली आहे. तसेच काही परकीय मालमत्ता निर्माण झाल्या आहेत आणि पैसे अजूनही नवीन नावाने जमा आहेत, असेही ईडीने म्हटले आहे.

एमटेक ग्रुप देशातील मोठ्या कंपन्यांपैकी एक-
एमटेक ग्रुप ही देशातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीचे ग्राहक जगभरात आहेत. यामध्ये क्रँक शाफ्ट, फोर्जिंग्ज, कास्टिंग ॲल्युमिनियम, कनेक्टिंग रॉड्स, व्हील लग्स आणि स्टीयरिंग नकल्स समाविष्ट आहेत. भारताशिवाय इतर अनेक देशांमध्येही त्याच्या कंपन्या आहेत. ज्यामध्ये ब्राझील, यूके, जर्मनी, इटली, मेक्सिको, हंगेरी आणि यूएस यांचा समावेश आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.