Published On : Wed, Jul 10th, 2019

जीएसटी कर प्रणालीतून आर्थिक विकास – सुधीर मुनगंटीवार

Advertisement

मुंबई : भयमुक्त, भुकमुक्त आणि विषमता मुक्त भारताचे बीज हे आर्थिक स्वातंत्र्यात रुजले असून हे स्वप्न साकार करावयाचे असेल तर आर्थिक विकासाची गती वाढायला हवी, जीएसटी कर प्रणालीतून हे शक्य आहे, असे प्रतिपादन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

वस्तू आणि सेवा कर प्रणालीस दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर नुकत्याच आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर, आमदार राज पुरोहित,सेंट्रल जीएसटी च्या मुंबई झोनच्या आयुक्त संगिता शर्मा, आयुक्त राजीव जलोटा आदी मान्यवर उपस्थित होते.

Gold Rate
02 july 2025
Gold 24 KT 97,500 /-
Gold 22 KT 90,700 /-
Silver/Kg 1,06,600/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

वस्तू आणि सेवा कर प्रणालीची उत्कृष्ट अंमलबजावणी करून कर चोरी रोखणाऱ्या आणि अधिकाधिक महसूल गोळा करणाऱ्या केंद्रीय तसेच राज्याच्या अधिकाऱ्यांचा वित्तमंत्र्यांचा हस्ते गौरव करण्यात आला.

एक देश, एक करप्रणाली, एक बाजारपेठ हे या करप्रणालीचे वैशिष्ट्य असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले, आपल्याला देशाच्या आर्थिक स्वातंत्र्याचे साक्षीदार होण्याचे भाग्य लाभले आहे. संसदेमध्ये एकमताने एकमुखाने या कायद्याला मान्यता मिळाली आहे. आतापर्यंत या कर प्रणालीसंदर्भात झालेले निर्णय ही वस्तू आणि सेवा कर परिषदेमध्ये एकमताने घेण्यात आले आहेत. यापुढेही अशाच एकरूपतेने काम करत राज्य आणि देशाला विकासाच्या मार्गावर अग्रस्थानी ठेऊया.

राज्यात जीएसटीची अंमलबजावणी यशस्वी- दीपक केसरकर

वस्तू आणि सेवा कर प्रणालीच्या यशस्वी अंमलबजावणीमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि तत्कालीन अर्थमंत्री अरूण जेटली यांचे खूप महत्वाचे योगदान आहे असे राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. कोणतीही कर प्रणाली परिपूर्ण नसते. लोकांना सोयीची करप्रणाली देणे हे शासनाचे कर्तव्य असते म्हणून या करप्रणालीत ही वेळोवेळी सुधारणा झाल्या. राज्यात वस्तू आणि सेवा करप्रणालीची अंमलबजावणी यशस्वीरित्या होत असून वाढीव करजाळे आणि कर महसूल हे त्याचे उत्तम उदाहरण असल्याचे ही श्री.केसरकर यांनी सांगितले.

Advertisement
Advertisement