नागपूर :सलग तीन दिवस नागपुरात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मागील दोन दिवसांपासून पारशवीनी आणि उमरेड या भागात भूकंपाचे धक्के नोंदवले गेले होते. रविवारी उमरेड तालुक्यातील आमगाव, देवळी, भिवगड या भागात भूकंपाचे धक्के बसले.
नागपूर शहरात ५ किलोमीटर परिसरात हे भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याची नोंद करण्यात आली. नोंद नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीच्या वेबसाईटवर यासंदर्भात माहिती आहे.
शहरात दुपारी ३.११ मिनिटे ९ सेकंद या वेळेत झाला आहे.
या भूकंपाची तीव्रता उत्तरेस २१.२९ लॅटित्युड, तर पूर्वेस ७९.४४ लांबपर्यंत होती.भूकंपाच्या या धक्यांचा नागपूर शहरावर फारसा परिणाम जाणवत नसल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असं आवाहन देखील करण्यात आले आहे.