नागपूर : विदर्भातील वाशिम जिल्ह्यासह मराठवाड्यातील हिंगोली, परभणी, नांदेडमध्ये सकाळी 07:14 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले आहे. यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. जिल्हा प्रशासनाने नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
नांदेड परभणी हिंगोली या जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. सकाळी 7.14 वाजता भूकंपाचा धक्का जाणवला. नांदेड मध्ये भूकंपाची 4 पूर्णांक 05 अशी रिस्टर स्केलवर नोंद झाली आहेविदर्भातील वाशिम जिल्ह्यासह हिंगोली, परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यातील काही भागातही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.भूकंपचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा गावात आहे. नांदेड व परभणी जिल्ह्यात या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. तर अकोला जिल्ह्यातील काही भागातही धक्के बसले. अमरावती, चंद्रपूर ते तेलंगणात करीम नगरपर्यंत भूकंपाचा हादरा बसल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान या भूकंपामुळे कोणतीही जीवित हानी झालेली नाही.तसेच कोणत्याही मालमत्तेचा नुकसान झाले नाही. या प्रकारावर प्रशासन स्थितीवर लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचा आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.