नागपूर : नागपूरसह राज्यात ठिकठिकाणी सर्वत्र गणेश विसर्जनाचा उत्साह दिसत आहे.अनंत चतुर्दशीनिमित्त लाडक्या गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी नागपुरात जिल्ह्यात नद्या-तलाव तसंच कृत्रिम तलावांजवळ भक्तांचा जनसागर उसळला आहे.
मागील दिवस भक्तिभावे पूजा करताना गणेशभक्तांमध्ये उत्साह असला, तरी साश्रू नयनांनी बाप्पाला निरोप दिला जात आहे.
शहरातील अनेक गणपतींची मोठ्या थाटामाटात मिरवणूक निघाली.
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, ढोल ताशांच्या गजरात आपल्या लाडक्या बाप्पाला भक्त निरोप देत आहेत.