Published On : Tue, Jun 25th, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपूर विमानतळाला पुन्हा बॉम्बने उडविण्याच्या धमकीचा ई-मेल; सुरक्षेत वाढ

Advertisement

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाला पुन्हा एकदा बॉम्बने उडवण्याची धमकीचा पुन्हा ई-मेल आल्याने खळबळ उडाली.

हा ईमेल प्राप्त झाल्यानंतर विमानतळावरील सुरक्षा वाढविण्यात आली आहे.विमानतळ परिसरात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रवाशांसह त्यांना सोडण्यात येणाऱ्या वाहनांची कसून चौकशी करण्यात येत आहे.

दरम्यान नागपूरसह देशातील इतरही विमानतळांना उडविण्याच्या धमक्‍या देण्यात आल्‍या आहेत.

अशा प्रकारचा ईमेल प्राप्त होण्याची गेल्या दोन महिन्यातील ही चौथी घटना आहे. यापूर्वी देखील देशातील 40 विमानतळांना उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.