फिडर सेवा सोबतच,चार्जिंग पॉइंट देखील उपलब्ध
नागपूर : महा मेट्रोने तिकीट दरात ५०% सूट दिली असून प्रवासी या सेवेचा वापर करीत आहे. महा मेट्रोने प्रदूषणमुक्त आणि वाहतुकीला सुलभ अशी ई – स्कुटर प्रणाली सेवा प्रवाश्यान करता मेट्रो स्टेशन येथे उपलब्ध करून दिली असून खापरी, एयरपोर्ट,जय प्रकाश नगर,रहाटे कॉलोनी,अजनी चौक, लोकमान्य नगर मेट्रो भवन येथून ही फिडर सेवा सुरु आहे तसेच इंस्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स,एल.ए.डी चौक,वासुदेव नगर,सिताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशन येथे चार्जिंग स्टेशन व ई- फिडर सेवा लवकरच सुरु होणार आहे.
महा मेट्रोने केएचएस असोसिएटस,नागपूर या कंपनी सोबत १० मार्च २०२० रोजी सामंजस्य करार केला असून या कंपनीच्या स्विच ई राईड अँप द्वारे नागरिक ई- स्कुटर चा वापर करू शकतात तसेच ईटीओ मोटर्स आणि त्वरित मोबिलीटी ने ई- रिक्षा फिडर सर्विस उपलब्ध करून दिली आहे.
अश्या प्रकारे आहे ई- फिडर सेवाचा किराया :
• ई – सायकल १ रु. प्रति मिनिट
• लो -स्पीड टू -व्हीलर करिता १.५ रु. प्रति मिनिट
• ई- स्कुटर : १.५ रु. प्रति मिनिट, ३५ रु. प्रति तास
मल्टी मॉडेल इंटीग्रेशन अंतर्गत फस्ट टू लास्ट माईल कनेटीव्हीटी अशी संकल्पना असून याद्वारे प्रत्येक प्रवाशाला स्टेशनवरून वाहतुकीची सुलभ यंत्रणा उपलब्ध होणार आहे.