Published On : Sat, Jun 22nd, 2019

काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सतीष चतुर्वेदी यांचे चिरंजीव दुष्यंत चतुर्वेदी शिवसेनेत प्रवेश करणार

Advertisement

मुंबई :काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सतीष चतुर्वेदी यांचे चिरंजीव दुष्यंत चतुर्वेदी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. सतीष चतुर्वेदी हे विदर्भाच्या राजकारणातील मोठं नाव आहे. 25 वर्ष आमदार आणि 10 वर्ष कॅबिनेट मंत्री असलेले सतीष चतुर्वेदी यांचा विदर्भात मोठा जनसंपर्क आहे. त्यांच्या मुलाच्या रुपाने शिवसेना विदर्भात भाजपलाच शह निर्माण करण्याच्या प्रयत्नात दिसत आहे.

दुष्यंत चतुर्वेदी सध्या त्यांच्या शैक्षणिक संस्थांचं काम पाहण्यासोबतच सामाजिक कामांमध्येही व्यस्त असतात. आता राजकीय कारकीर्दीची सुरुवात ते करणार आहेत. वडील सतीष चतुर्वेदी यांच्याकडूनच त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. मोठी राजकीय वारसा असलेल्या माजी मंत्र्याच्या मुलाला पक्षात घेऊन शिवसेनेकडून विदर्भात आणखी जम बसवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. विधानसभेसाठी शिवसेना सध्या विभागनिहाय तयारी करत आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.