Published On : Thu, Jun 3rd, 2021

लॉक डाउन काळात ऑन लाईनकडे कल वाढला ४०२ कोटींचा वीज बिल भरणा केला

Advertisement

नागपूर: मागील दोन महिन्यापासून कोरोना साथ रोगाला प्रतिबंध घालण्यासाठी सुरु असलेल्या लॉक डाउन काळात लागू असलेल्या प्रतिबंधामुळे महावितरणकडून देण्यात आलेल्या वीज देयकाचा भरणा वीज ग्राहकांनी ऑन लाईन पद्धतीने केला आहे. जानेवारी ते मे-२०२१ या काळात नागपूर परिमंडळात येणाऱ्या नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील वीज ग्राहकांनी तब्बल ४०२ कोटी रुपयांचा भरणा ऑन लाईन पद्धतीने केला आहे.

नागपूर शहरातील वीज ग्राहकांनी लॉक डाउनच्या काळात २९८ कोटी रुपयांची देयके ऑन लाईन पद्धतीने भरली आहेत. एप्रिल महिन्यात नागपूर शहरातील २ लाख ८० हजार ६३८ वीज ग्राहकांनी ५२ कोटी ९ लाख रुपयांचा भरणा, तर मे महिन्यात ३ लाख २५ हजार ३८० वीज ग्राहकांनी ७५ कोटी ६८ लाख रुपयांचा भरणा केला आहे. जानेवारी ते मे-२०२१ या काळात शहरातील १४ लाखापेक्षा अधिक वीज ग्राहकांनी ऑन लाईन पद्धतीचा वापर करीत वीज देयकाचा भरणा केला आहे. नागपूरच्या ग्रामीण भागातही वीज ग्राहकांचा ऑन लाईन पद्धतीने वीज देयकाची रक्कम भरण्याचा कल वाढू लागला आहे. मे महिन्यात प्रतिबंध असल्याने ग्रामीण भागात अनेक ठिकाणी घराबाहेर पडून वीज देयकाची रक्कम भरण्यासाठी वीज बिल भरणा केंद्रावर जाणे शक्य नव्हते. परिणामी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ७९,६५९ वीज ग्राहकांनी त्यांच्याकडे असलेली १२ कोटी ३७ लाख रुपयांची रक्कम ऑन लाईन पद्धतीने महावितरणच्या तिजोरीत जमा केली. एप्रिल महिन्यात ६२,६९९ वीज ग्राहकांनी ८ कोटी ६६ लाख रुपयांची रक्कम जमा केली. जानेवारी ते मे-२०२१ या काळात ग्रामीण भागातील सुमारे साडेतीन लाख वीज ग्राहकांनी ५७ कोटी ४१ लाख रुपयांचा भरणा ऑन पद्धतीने केला.

Gold Rate
26 dec 2025
Gold 24 KT ₹ 1,37,900/-
Gold 22 KT ₹ 1,28,200/-
Silver/Kg ₹ 2,28,500/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपूर जिल्ह्यासोबतच वर्धेतील वीज ग्राहकांचा ऑन लाईन पद्धतीने वीज देयकाची रक्कम भरण्याकडे काळ वाढू लागला आहे. जानेवारी ते मे २०२१ या कालावधीत वर्धा जिल्ह्यातील २ लाख ७८ हजार वीज ग्राहकांनी २६ कोटी पेक्षा अधिक रकमेचा भरणा ऑन लाईन पद्धतीने केला आहे. संपूर्ण मे महिन्यात वर्धेत संचारबंदी असताना वर्धेतील ६६ हजार ८०१ वीज ग्राहकांनी जवळपास ४७ कोटी रुपयांची रक्कम ऑन लाईन पद्धतीने महावितरणकडे जमा केली. वीज बिल भरण्यासाठी महावितरण ने ग्राहकांना विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.महावितरणच्या www.mahadiscom.in या अधिकृत वेबसाईट व महावितरणच्या मोबाईल ॲपवर वीजबिल पाहण्याची व हे बिल भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.वीजग्राहकांसाठी तयार केलेले मोबाईल ॲप इंग्रजी व मराठी भाषेत उपलब्ध आहे. या ॲपमध्ये सर्व प्रकारच्या सुविधा दिलेल्या आहेत. प्रामुख्याने एकाच खात्यातून ग्राहकांना स्वतःच्या अनेक वीजबिलांचा भरणा करण्याची सोय आहे.त्यासाठी नेटबॅकींग, क्रेडीट/डेबीट कार्डासह मोबाईल वॅलेट व कॅश कार्ड्सचा पर्याय उपलब्ध आहे.

तसेच भरलेल्या पावतीचा तपशीलही वेबसाईट व ॲपवर उपलब्ध आहे.क्रेडीट कार्ड वगळता महावितरणचे लघुदाब वर्गवारीचे वीज बिल भरण्यासाठी ‘ऑनलाईन’चे उर्वरित सर्व पर्याय आता निःशुल्क आहेत. नेटबॅकींगचा अपवाद वगळता वीजबिलांचा ‘ऑनलाईन’ भरणा करण्यासाठी याआधी ५०० रुपयांपेक्षा अधिक रकमेवर शुल्क आकारण्यात येत होते. परंतु क्रेडीट कार्ड वगळता नेटबॅकिंग, डेबीट कार्ड, कॅशकार्ड, यूपीआय, डिजिटल वॉलेटच्या माध्यमातून ‘ऑनलाईन’द्वारे होणारा वीज बिल भरणा आता निःशुल्क आहे. तसेच ‘ऑनलाईन’ बिल भरण्यासाठी ०.२५ टक्के सूट दरमहा ५०० रुपयांच्या मर्यादेत देण्यात येत आहे. या सर्व सुविधा लक्षात घेऊन लघुदाब वर्गवारीतील सर्व वीजग्राहकांनी घरबसल्या महावितरणची वेबसाईट, मोबाईल ॲप किंवा इतर ‘ऑनलाईन’ पर्यांयाद्वारे वीजबिलांचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement