Published On : Tue, Jun 12th, 2018

भय्युजी महाराजांच्या निधनाने अध्यात्मिक व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी: खा. अशोक चव्हाण

Ashok Chavan

मुंबई: भय्युजी महाराज यांच्या अकाली निधनाने अध्यात्मिक व सामाजिक क्षेत्रात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

भय्युजी महाराज यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, भय्युजी महाराज यांच्या निधनाची बातमी अत्यंत धक्कादायक आहे.

भय्युजी महाराज यांनी अध्यात्मिक व सामाजिक क्षेत्रामध्ये मोठे योगदान दिले. देशभरातील लाखो लोकांचे ते अध्यात्मिक गुरू होते. अध्यात्मासोबतच सुर्योदय आश्रमाच्या माध्यमातून त्यांनी समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात देण्याची प्रशंसनीय मोहिम चालवली होती.

अनेक सामाजिक उपक्रमांच्या आयोजनासाठी त्यांचा पुढाकार अनुकरणीय होता. भय्युजी महाराज यांच्या स्मृती चीरकाळासाठी सर्वांच्या मनात जतन राहतील, असे सांगून खा. अशोक चव्हाण यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.