Published On : Thu, Sep 12th, 2019

अतिवृष्टीने पुन्हा घर कोसळल्याने धरमनगरचे भरणे कुंटुब उघडयावर

Advertisement

कन्हान : – धरमनगर पिपरी येथे पावसा च्या अतिवृष्टीने मध्यरात्री पुन्हा भरणे यांचे घर कोसळल्याने दोन बकरीचा मुत्यु होऊन कुटुंबीय किरकोळ जखमी झाल्याने हलाखीचे जिवन जगण्या-या भरणे कुंटुब बेघर होण्याच्या उबंरठयावर असल्याने शासना व्दारे आर्थिक मदत करण्याची मांगणी ग्रामस्थानी केली आहे.

बुधवार (दि.११) रात्री झालेल्या जोरदार पावसाच्या अतिवृष्टीने मध्यरात्री नगरपरिषद कन्हान – पिपरी अंतर्गत प्रभाग क्र ३ धरमनगर पिपरी येथील रहिवासी टेकचंद भरणे यांचे कुंटुब असुन कसे बसे हातमजुरीचे कामधंदा करून कुंटुबीयांचा उदरनिर्वाह करित होते. त्यांत एक मेव राहण्याचे घर सतत पावसाच्या अतिवृष्टीने मध्यरात्री घर कोसळल्याने टेकचंंद भरणे यांच्या कुंटुबाला बेघर व्हावे लागले.

राहण्याचे एकमेव आश्रयस्थान म्हणजे घर हे मध्यरात्री कोसळले यात दोन पाळीव शेळीचा (बक-यांचा) मुत्यु झाला तर कुंटुबिय वेळीच जागे झाल्याने किरकोळ जखमी झाले. घरातील जिवनाश्यक वस्तु मातीचा मलब्यात अन्न, वस्त्र व सामान दबुन संपूर्ण उद्धवस्त झाल्याने आता यांना राहण्यासाठी आणि दोन वेळेचे जेवन व कपड य़ांची सुद्धा सोय नसल्याने भरणे कुंटुब आज जिवन मरणासन्न यातनेच्या मार्गावर असुन कुंटुबाला उघड्यावर जिवनव्यापन करण्याची पाळी ओढावली आहे.

यास्तव नगरपरिषद, तालुका व जिल्हा शासन प्रशासनावर विराजमान अधिका ऱ्यांना व जनप्रतिधिनांना निवेदनातून कळकळीची विनंती करण्यात येत आहे की दोन दिवसांत अतिवृष्टीने सोमवार (दि.९) ला लखन बावणे व बुधवार (दि.११) ला टेकचंद भरणे यांचे मध्यरात्री राहते घर कोसळल्याने या दोन्ही कुंटुबा ची व घराची पाहणी करून त्वरित शासनाव्दारे आर्थिक मदतीचे सहकार्य करून यथोचित मदत करावी अशी मागणी युवा समाजसेवक प्रशांत बाजीराव मसार, ग्रामस्थ परमानंद शेंडे, रवि यादव, फत्तुजी वालदे, दिपक तिवाडे, धिरज विणकणे, गोपाल कुंभरे, दिलीप डोंगरे, सुभाष मडावी, ओमकार निमजे, अशोक डडुरे, विवेक खोब्रागडे, प्रकाश भोपे, राजकुमार भरणे, मंजु यादव, इंदिरा वालदे, जया खोब्रागडे, सुनंदा कुंभरे, जयश्री डोंगरे, ताराबाई भोपे आदीसह पिपरी ग्रामवासी यांनी केली आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.