Published On : Fri, Apr 3rd, 2020

कोरोना मुळे शेतकरी राजा आर्थिक संकटात

कामठी :-संपूर्ण जगात धुमाकूळ घातलेल्या कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव भारतासह महाराष्ट्रात सुदधा पसरला असून या कोरोना च्या पाश्वरभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानव्ये 21 दिवसांचा लॉकडॉऊन लागू करण्यात आला आहे सोबतच जमावबंदी सह संचारबंदी सुद्धा लागू करण्यात आल्याने कामठी तालुक्यातील जीवणावश्यक वस्तू ची दुकाने सोडुन इतर सर्व व्यवहार ठप्प होऊन पडले आहेत त्यातच अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे अशा स्थितीत शेतकऱ्यांना शेतमजूर मिळणे कठिण झाल्याने शेतातील शेतमाल शेतातच पडुन आहे परिणामी या कोरोना मुळे खरे पाहता येथील बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात अडकला आहे.

या लोकडॉउन मुळे सर्वाधिक शेतकरी वर्ग अडचणीत आला असून बाजार अंतिम टप्प्यात असलेल्या महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेला ब्रेक लागल्याने पीकविमा गुंडाळला गेला आहे.कृषी विषयक सर्व योजना अडचणीत पडल्या असून रब्बी हंगामातील गहू काढणीवर आला आहे परंतु हाता तोंडाशी आलेल्या घासाला शेतकरी पोरका होत आहे एकूणच शेतकऱ्यांचे पूर्ण व्यवहार ठप्प पडल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन बिघडले असून शेतकऱ्यालाआ कोरोना मुळे मजुराअभावी शेतातील नुकसानीची झळ सोसावी लागत आहे