Published On : Mon, Mar 27th, 2017

शेतकऱ्यांसाठी दु:खदायी बातमी; यंदा सरासरीपेक्षा पाऊस कमी


मुंबई:
वर्षानुवर्षांची नापीकी, दुष्काळ आणि कर्जबाजारीपणा यांमुळे मेटाकुटीस आलेल्या बळीराजासाठी पुन्हा एक दु:खदायी बातमी आहे. जुन ते सप्टेंबर या चार महन्यात सरासरीच्या तुलनेत देशात कमी पाऊस पडेल असा अंदाज स्कायमेट या हवामान संस्थेने व्यक्त केला आहे. या कालावधीत केवळ 95 टक्के म्हणजेच अवघा 887 इतका पाऊस पडेल असे स्कायमेटने म्हटले आहे.

स्कायमेटने वर्तवलेल्या अंदाजानुसार मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मान्सून सामान्यच असेल. तर, देशाचा विचार करता जूनमध्ये सर्वाधीक पाऊस पडेल. देशभरातील पावसाचे प्रमाण 102 इतके असेन. तर, त्यानंतरच्या सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा पावसाचे प्रमाणहे 96 टक्के इतके असेन. जनमध्येही साधारण 102 टक्के इतका पाऊस होऊ शकतो. मात्र, यात 70 टक्के पाऊस हा सामान्यच असेल. तर, 20 टक्के शक्यता ही सामान्य स्थितीपेक्षा काहीशी अधिक असेल. जूननंतर जुलैमध्ये 94 टक्के, ऑगस्टमध्ये 93 टक्के आणि सप्टेंबरमध्ये 96 टक्के पावसाची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे.

दरम्यान, मार्च महिन्यातच तापमानानाने आपले रूप दाखवण्यास सुरूवात केली आहे. ग्रामिण भागात पारा उच्च पातळीवर पोहोचत असून, उन्हाच्या झळांनी दुपारी घराबाहेर पडणे मुश्किल होऊन बसले आहे. शरहातही वेगळी स्थिती नाही. शरहातही उन्हाचा तडाका वाढला असून, पारा वरचढच आहे. शहरात भविष्याचा विचार करून आतापासूनच पाणीकपात करण्याचा विचार सुरू झाला आहे. तर, ग्रामिण भागात आताच पाणीटंचाई आणि जनावरांच्या चाऱ्याचा सवाल निर्माण झाला आहे.

शेतकऱ्यांच्या स्थितीतर फारच केविलवाणी आहे. कर्जबाजारीपणामुळे शेतकरी हैराण आहे. त्यातच त्याला नैसर्गिक आपत्तींचाही फटका बसत आहे. शेतकऱ्याला या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी कर्जमाफीची जोरदार मागणी पूढे येत आहे. मात्र, विद्यमान राज्य सरकार त्याला फार अनुकूल नाही. सर्व राजकीय पक्षांच्या सुरात सुर मिसळून सत्ताधारीही कर्जमाफीचा मुद्दा बरोबर असल्याचे म्हणतात. प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्याचे कर्ज माफ होत नाही. त्यामुळे पावसाबाबतच्या बातमीने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या जखमेवर ओरखडा उमटला आहे.