Published On : Thu, Oct 19th, 2023
By Nagpur Today Nagpur News

ड्रग्ज प्रकरणावरून प्रश्न विचारल्याने मला धमकविणे कितपत योग्य ; सुषमा अंधरे नागपुरात कडाडल्या

Advertisement

नागपूर : महाप्रबोधन यात्रेच्या उद्घाटनासाठी नागपुरात दाखल झालेल्या ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठविली आहे. ससून रुग्णालयातून पसार झालेला, अमली पदार्थ तस्करीचा आरोप असलेल्या ललित पाटीलला पोलिसांनी अटक केली आहे.

याप्रकरणी अंधारे यांनी सत्ताधाऱ्यांविरोधात आवाज उठविला आहे. अंधारे यांनी ड्रग्ज प्रकरणावरून प्रश्न विचारल्याने आपल्याला धमकावले जात असल्याचा आरोप अंधारे यांनी नागपुरात पत्रकारांशी संवाद साधताना केला.

Gold Rate
24 April 2025
Gold 24 KT 96,500 /-
Gold 22 KT 89,700 /-
Silver / Kg 98,800 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मी ड्रग्ज प्रकरणावरून प्रश्न विचारल्यामुळे फडणवीस मला धमकावत आहेत. बोलणाऱ्याची तोंड बंद होतील, असे वक्तव्य राज्याचे गृहमंत्री असलेल्या फडणवीसांना शोभणारे नाही, अशी टीका अंधारे यांनी केली.

राज्याचा ‘उडता पंजाब’ होऊ नये, अशी माझी इच्छा आहे. इशारे ड्रग्ज माफियांना द्या मला नको, असा सल्लाही त्यांनी दिला. आयुष्यभर कायद्याच्या चौकटीत राहून कार्य केले आहे, त्यामुळे अशा धमक्यांना मी घाबरत नाही, असेही त्या म्हणाल्या आहेत.

Advertisement
Advertisement