Published On : Thu, Nov 16th, 2023
By Nagpur Today Nagpur News

महाराष्ट्रातील बारमध्ये दारू पिणे महागणार ; सरकारच्या निर्णयाविरोधात नागपुरात बारमालकांचे निदर्शने

Advertisement

नागपूर : महाराष्ट्र सरकारने दारू पिणाऱ्यांना मोठा झटका दिला आहे. राज्य सरकारने मूल्यवर्धित करात (VAT) ५ टक्के वाढ जाहीर केली आहे. आता मद्यावरील व्हॅट १० टक्क्यांपर्यंत जाणार आहे. याची अंमलबजावणी १ नोव्हेंबरपासून होणार आहे. त्यामुळे राज्यात दारू महाग होणार आहे.

विशेष म्हणजे हा बदल फक्त क्लब, लाऊंज आणि बारमधील मद्यप्रेमींना लागू असेल. राज्य सरकारच्या या निर्णयाचा परिणाम मद्यविक्री विभागावर होणार आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात नागपुरात आज सर्वच बार बंद करण्यात आले असून निदर्शने करण्यात येत आहे. सरकारने ही दरवाढ मागे घ्यावी या मागणीसाठी नागपूरसह विदर्भात आज आंदोलन करण्यात आले.

Gold Rate
Feb 17 th, 2026 - Time 11.45Hrs
Gold 24 KT ₹ 1,54,000 /-
Gold 22 KT ₹ 1,43,200 /-
Silver/Kg ₹ 2,40,500 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

बार मालकांनीही आज बार बंदची घोषणा केली असून सकाळपासून सर्व बार बंद ठेवून निषेध व्यक्त केला, नागपुरात ही निदर्शने झाली या ठिकाणी बार मालकांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत वाढीव व्हॅट मागे घेण्याची मागणी केली. तसेच बार मालकांनी मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले व हा आदेश लवकरात लवकर मागे घेण्याची मागणी केली.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement