Published On : Wed, Oct 17th, 2018

ग्रंथदिंडी, ग्रंथपालखी व वाचन प्रेरणा दिनाने डॉ कलाम जयंती साजरी

कन्हान : – सार्वजनिक वाचनालय, भारतरत्न इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय व पं नेहरू विद्यालय कन्हान यांच्या सयुक्त विदमाने महामहीम डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती ग्रंथदिंडी, ग्रंथपालखी व वाचन प्रेरणा दिनाने साजरी करण्यात आली .

सोमवार (दि.१५)ला सकाळी १० वाजता भारतरत्न इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय व पं नेहरू विद्यालय कन्हानच्या विद्यार्थी व्दारे लेझीम, ढोल ताश्याच्या गजरात ग्रंथदिंडी काढुन महामार्गाने भ्रमण करित सार्वजनिक वाचनालय हनुमान नगर येथे पोहचुन ग्रंथपालखीचे व डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ छायाताई नाईक अध्यक्ष नगर सुधार समिती कन्हान, गंजेद्र गिरडकर सामाजिक कार्यकर्ता , माणिकराव वाघधरे उपाध्यक्ष सा. वाचणालय कन्हान, बी जी बोरकर प्राचार्य, दिनकर मस्के, नथ्थुजी खानजोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत माल्यार्पण आणि लालफित कापुन ग्रंथ प्रदर्शनीचे उद्घाटन करून वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली .


उपस्थितीत विद्यार्थी व वाचकांनी ” वाचनध्यास ” अंतर्गत ग्रंथ वाचन केले . डॉ अब्दुल कलाम यांच्या जिवनावर मान्यवरांनी मार्गदर्शन केले . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सचिव मनोहर कोल्हे यांनी तर आभार प्रदर्शन ग्रंथपाल श्याम बारई यांनी केले . मिठाई वितरण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली . कार्यक्रमास भास्कर टिप्रमवार, कमलसिंह यादव, सचिन बनकर, अतुल खोब्रागडे , विलास बोरकुटे , रोशन तांडेकर, चंद्रकांत जुळे , मनोज चिकटे , कांबळे सर, वर्षा शिंगाडे , वंदना चिकटे , प्रविण साबळे , प्रदीप भोंडे , आशिष सायरे , सचिन वासनिक, रवी वानखेडे सह गणमान्य नागरिक उपस्थित होते .