
नागपूर : राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज (ता. 14) महापौर कार्यालयातील त्यांच्या तैलचित्राला माननीय महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, आयुक्त डॉ. विपीन, नगरसेवक श्री. अभिजीत प्रभूकांत झा, अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी, अतिरिक्त आयुक्त श्री. अंकित, उपायुक्त श्री. निर्भय जैन, उपायुक्त श्री. अशोक गराटे, उपायुक्त श्री. मंगेश खवले, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर उपस्थित होते.
त्याचप्रमाणे संविधान चौकातील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी पुष्पहार अर्पण करून वंदन केले.
यावेळी उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, स्थायी समितीच्या सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे, आयुक्त डॉ. विपीन, स्थापत्य व प्रकल्प विशेष समिती सभापती श्रीमती अश्विनी जिचकार, नगरसेवक श्री. विनय दाणी, श्री. सुनील हिरणवार, अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी व अतिरिक्त आयुक्त श्री. अंकित यांनी सुद्धा पुष्हार अर्पण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.









